नवी दिल्लीः लडाखमध्ये LACवर भारत-चीनमध्ये मोठा संघर्ष झाला आहे. दोन्ही देशांमधल्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं आहे. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सक्षम असल्याचं सांगितलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही सावध प्रतिक्रिया येऊ लागल्या. संयुक्त राष्ट्र संघानं दोन्ही देशांनी आक्रमक न होता चर्चेतून तोडगा काढावा, असा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनं चीनसंदर्भात सावध पवित्रा घेतला असतानाच रशियानं पुन्हा एकदा मैत्रीला जागत भारताला खुलेआम समर्थन दिलं आहे. सध्या लडाखच्या सीमेवर सुरू असलेला संघर्ष आणि चीनबरोबरची समस्या सोडवण्यासाठी रशियानं भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे, असं वृत्त झी न्यूजनं उच्चपदस्थ सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. त्यामुळे चीनच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. रशियाचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन रोमन बाबुश्किन म्हणाले,"आम्हाला आशा आहे की दोघांमधील तणाव लवकरच निवळेल आणि सहकार्याच्या संभाव्यतेचा विचार करून दोन्ही पक्ष सकारात्मक संवाद कायम ठेवतील. रशियाचा विश्वास आहे की, ते या क्षेत्रातील वाद सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील." यापूर्वी बुधवारी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह म्हणाले होते की, “भारत आणि चीनच्या लष्करी प्रतिनिधींनी संपर्क साधल्याचे आधीच जाहीर केले गेले आहे, सध्या दोन्ही देशांकडून परिस्थितीवर चर्चा सुरू आहे. ते वाद आणि संघर्ष कमी करण्याच्या उपायांवर चर्चा करीत आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतो.भारत आणि रशिया यांच्यात घनिष्ट संबंध आहेत. दोन्ही देश आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार एकमेकांना सहकार्य करत आले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन या दोघांनी यंदा कोरोनाच्या संकटासह अनेकदा चर्चा केलेली आहे. पुढील आठवड्यात तीन देशांचे परराष्ट्र मंत्री RIC (रशिया, भारत, चीन) यांची बैठक होणार आहे. रशियन राजदूताने या बैठकीला एक “निर्विवाद वास्तव” म्हटले आहे. सीमा संघर्षात त्रिपक्षीय सहकार्याच्या सध्याच्या टप्प्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, “त्यांनी चर्चा संपवल्याची कोणतीही चिन्हे नाहीत”. तसेच या वर्षाच्या शेवटी रशिया एससीओ आणि ब्रिक्स समिटचे आयोजन करणार आहे.
हेही वाचा
मोदीजी, महागाईने सामान्य जनतेचे चिपाड झाले, अजून किती पिळणार?- सचिन सावंत
हा कसला बहिष्कार?... चिनी कंपनीचा मोबाईल अवघ्या काही मिनिटांत 'आऊट ऑफ स्टॉक'
सत्तेत आल्यापासून आम्ही १०० टक्के समाजकारणच केले- आदित्य ठाकरे
चीनसोबतच्या तणावात अमेरिका भारताला देणार दिलासा; GSPचा दर्जा पुन्हा मिळणार?
माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे होणार वितरण, प्रथम विजेत्यास ५ लाख मिळणार
राहुल गांधींचा वाढदिवस साजरा न करता त्याच पैशातून काँग्रेस कार्यकर्त्यांचा गरजूंना मदतीचा हात
Unlock 1.0: राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स अन् वाहन नोंदणीच्या कामाला सुरुवात