नवी दिल्ली : चीनच्या सैन्याकडून लडाखमधील तीन ठिकाणी घुसखोरी करण्यात आल्याने संपूर्ण चिंतित आहे. परंतु चीनच्या या चुकीच्या पाऊलाबाबत मोदी सरकारने मात्र मौन बाळगले असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. चीनी सैनिकांकडून लडाखमधील गलवान नदीचे खोरे, हॉट स्पिंग आणि पेंगोंग सरोवर या परिसरात घुसखोरी केल्याच्या वृत्तानंतर सुरजेवाला यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले की, भारताची भौगोलिक सुरक्षा आणि एकता याबाबत समझोता केला जाऊ शकत नाही. परंतु आलेल्या बातम्यांवरून चीनने गलवान नदीचे खोरे, हॉट स्पिंग आणि पेंगोंग सरोवर या परिसरात अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. मागील पाच दशकांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ एकही दुर्घटना घडलेली नाही. भारताचा एकही सैनिक भारत-चीन सीमेवर शहीद झालेला नाही. पण आता भारताचा एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झालेआहेत.आपले सैनिक सैनिक शहीद होणे ही बाब गंभीर आणि अस्वीकारार्ह आहे. संपूर्ण देश चिडलेला असताना पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग मात्र गप्प बसले आहेत. या घटनेबाबत पंतप्रधानांनी देशासमोर उत्तर दिले पाहिजे. आपले सैनिक शहीद झाले असतील किंवा जखमी झाले असतील तर हे खरे आहे का हे जनतेला सांगितले पाहिजे. पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री यावर गप्प का बसले आहेत, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.जनतेसमोर नेमके चित्र मांडले पाहिजे - एच. डी. देवेगौडामाजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा म्हणाले की, चीनची घुसखोरी चिंताजनक आहे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या विचलित करणाºया आहेत. सीमेवर त्या ठिकाणी नेमके काय घडले आहे याचे चित्र देशासमोर स्पष्टपणे मांडले गेले पाहिजे.ठोस उत्तर देण्याची वेळ - कॅप्टन अमरिंदर सिंगचीनच्या या कृत्याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, देशाचे रक्षण करताना दररोज आमच्या सैनिकांचे बळी जावेत इतके त्यांचे आयुष्य स्वस्त नाही. चीनची सतत आक्रमण करण्याची वृत्ती आणि आपल्या प्रादेशिक अधिकाराचे उघडउघड केलेले उल्लंघन या विरोधात भारताने आता उत्तर देण्याची वेळ आली आहे....मग मरेपर्यंत मारहाण केली काय? - ओेमर अब्दुल्लानॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला म्हणाले की, तणावाच्या स्थितीत दोन्ही देशांकडून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच चीनकडून भारताच्या तीन जवानांना गोळ््या घातल्या जात असतील तर ही स्थिती किती गंभीर आहे हे लक्षात घ्यावे. अब्दुल्ला यांच्या टिप्पणीवर एका युजरने गलवान भागात सैन्याकडून गोळीबार झाला नसल्याचे लक्षात आणून देताच अब्दुल्ला यांनी प्रतिप्रश्न केला आहे की, याचा अर्थ त्यांना मरेपर्यंत मारहाण करण्यात आली की काय? मग हे तर आणखी भयानक आहे.तामिळनाडूची शहीद जवानाच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदतया हल्ल्यात शहीद झालेले एक सैनिक के. पलानी मूळचे तामिळनाडूतील रामनाथपुरम जिल्ह्याच्या कडूक्कलूर गावातील आहेत.मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी या सैनिकाच्या कुटुंबीयांना २० लाखांची मदत जाहीर केली आहे. अण्णा डीमके आणि विरोधी पक्ष डीएमके या दोघांनाही शहीद अधिकारी आणि दोन जवानांना आदरांजली वाहिली.एमडीएमकेचे महासचिव वायको यांनी आरोप केला की, जगभर कोरोना विषाणूचा प्रसाराला कारणीभूत ठरल्याने टीकेचा धनी ठरलेल्या चीनने हे कृत्य जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी उचलले आहे.
India China Face Off: पंतप्रधान, संरक्षणमंत्री गप्प का?-काँग्रेसचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 3:24 AM