शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

इच्छाशक्तीची गरज! भारत चीनला देऊ शकतो तब्बल 17 अब्ज डॉलरचा जबरदस्त झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 9:43 AM

India China Faceoff : भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. तर दुसरीकडे देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नवी दिल्ली - भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला.  भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. तर दुसरीकडे देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी तर आपल्या फोनमधून चीनी अ‍ॅप्स देखील हटवून याची सुरुवात केली आहे.

अनेक उद्योजकांनी देखील ई-कॉमर्स कंपन्यांनी चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंची विक्री करण्याची बंदी घालावी अशी मागणी केली आहे. भारतीयांनी जर ठरवलं तर चीनला 17 अब्ज डॉलरचा झटका बसू शकतो. चीनमधून भारतात होणाऱ्या एकूण आयातीमधील रिटेल ट्रेडर्स जवळपास 17 अब्ज डॉलर इतके आहे. यामध्ये खेळणी, घरातील वस्तू, मोबाईल, इलेक्ट्रिक सामान आणि कॉस्मॅटिक उत्पादनांचा समावेश आहे. चीनमधून येणाऱ्या या वस्तू बंद झाल्या तर संबंधित वस्तूंची भारतात निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना फायदा होणार आहे.

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया संघटनेचे महासचिव व्ही के बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या सदस्य असलेल्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील चीनी वस्तूंचा स्टॉक संपवण्यास तसेच त्याच बरोबर यापुढे चीनी वस्तू मागवू नका असं सांगितलं आहे. आम्ही सरकारला देखील ई - कॉमर्स कंपन्यांना चीनी वस्तू विकण्यापासून रोखण्यात यावे ही विनंती केली आहे. कनफेडरेशन ऑफ वेस्ट बंगाल ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुशील पोद्दार यांनी देखील संघटनेने चीनी वस्तूंचा व्यापार बंद करण्याचा सल्ला दिला आहे.

द कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) देखील असाच निर्णय घेतला आहे. 'भारतीय वस्तू-आमचा अभिमान' अशी एक मोहिम या संघटनेने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये चीनी सामानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. CAITने चीनी उत्पादनांची एक यादीच प्रसिद्ध केली आहे. यात जवळपास 3 हजार वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. याच बरोबर CAITने सेलिब्रिटींना पत्र लिहून चीनी वस्तूंच्या जाहिराती करणे बंद करावे अशी विनंती केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्यात 'हे' औषध प्रभावी ठरणार; संक्रमण रोखण्यास मदत करणार

"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?" 

वरात, विधीसह रंगला विवाहसोहळा पण लग्नात नवरी ऐवजी होता पुतळा... एका लग्नाची गोष्ट

Flipkart Big Saving Days : खूशखबर! फ्लिपकार्टवर धमाकेदार सेल, स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर सूट

खतरनाक! डोंगराच्या टोकावर उभं राहून त्याने मारली बॅक फ्लिप अन्...; Video जोरदार व्हायरल

"पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!"

टॅग्स :Indiaभारतchinaचीनbusinessव्यवसाय