India China FaceOff: "चीनने भारताची जमीन बळकावलीय, यालासुद्धा अॅक्ट ऑफ गॉड म्हणणार का"?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 09:37 AM2020-09-11T09:37:03+5:302020-09-11T13:02:58+5:30
India China FaceOff: लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.
नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव विकोपाला गेलेला आहे. एकीकडे दोन्ही देशांच्या नेत्यांमधील बैठकांमधून वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैनिक आणि शस्त्रसामुग्रीचीही मोठ्या प्रमाणावर जमवाजमव सुरू आहे. दरम्यान, लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. चीनने घुसखोरी करून भारताची भूमी बळकावली आहे. ही बळकावलेली जमीन परत मिळवण्यासाठी भारत सरकार नेमकी काय योजना आखत आहे. की ही बाबसुद्धा अॅक्ट ऑफ गॉड म्हणून सोडून दिली जाईल, असा घणाघाती सवाल राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
The Chinese have taken our land.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 11, 2020
When exactly is GOI planning to get it back?
Or is that also going to be left to an 'Act of God'?
तणाव निवळण्यासाठी भारत-चीनमध्ये ५ सूत्री कार्यक्रमावर सहमती
चिनी सैन्याने केलेला घुसखोरीचा प्रयत्न आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर समोरासमोर आलेले भारत आणि चीनचे सैन्य यामुळे लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये मॉस्को येथे सुमारे अडीच तास चर्चा झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये तणाव निवळण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रमावर सहमती झाली आहेत. तसेच चर्चा चालू ठेवून सैनिकांना हटवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबतही दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण निवळण्यासाठी आणि सैन्य हटवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यामध्ये सुमारे अडीच तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये भारत आणि चीनमधील संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही देशांतील नेत्यांनी सर्वसहमतीच्यामाध्यमातून काम केले पाहिजे. तसेच परस्परांमधील मतभेदांना विवादाचे रूप देता कामा नये, या मुद्द्यावर सहमती व्यक्त केली आहे.
चीनसोबत वाद चिघळला; हॉटलाईनवर ब्रिगेडिअरांमध्ये बाचाबाची
तत्पूर्वी लडाखमध्ये चिनी सैनिकांनी धारदार हत्यारे घेऊन भारतीय जवानांवर हल्ल्याचा व चौकी ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचे पडसाद दोन्ही देशांच्या ब्रिगेडिअर स्तरावरील बैठकीवर उमटले होते. हॉटलाईनवर सुरु असलेल्या चर्चेत दोन्ही बाजूने बाचाबाची झाल्याने सीमेवर तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. सीमेवर जवान चीनची घुसखोरी हाणून पाडत असताना दुसरीकडे सैन्य अधिकाऱ्यांच्या स्तरावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु असून चीन भारतातून माघारी जाण्याचे मान्य करत नाहीय. यासाठी ब्रिगेडिअर स्तरावर चर्चा सुरु आहे. आज दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये हॉटलाईनवर चर्चा झाली. या अधिकाऱ्यांनी वाढत्या तणावामुळे समोरासमोर येणे टाळले आहे. ही चर्चा वादामध्ये परिवर्तित झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी