नवी दिल्ली: चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागातला तणाव वाढला आहे. याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेवरील तणावपूर्ण स्थितीची माहिती राज्यसभेत दिली. पूर्व लडाखमध्ये आपण आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहोत. सीमेवरील तणाव शांततेच्या मार्गानं सोडवण्याचा आपला प्रयत्न आहे. भारतीय जवान देशाचं संरक्षण करण्यास पूर्णपणे समर्थ आहेत, अशी ग्वाही त्यांनी दिली. भारताविरोधात चीनचा नवा डाव! सीमेवर लाऊड स्पीकर बसवून वाजवतायेत पंजाबी गाणीचीननं भारताच्या भूमीवर अनधिकृतपणे कब्जा केल्याचं राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितलं. 'भारताच्या ३८ हजार चौरस किलोमीटर जमिनीवर चीनचा कब्जा आहे. १९६३ मधील एका तथाकथित सीमा कराराअंतर्गत पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमधील ५ हजार १८० चौरस किलोमीटर भारतीय जमीन अवैधपणे चीनला सोपवली आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील जवळपास ९० हजार चौरस किलोमीटरवर चीननं दावा सांगितला आहे,' अशी माहिती राजनाथ यांनी दिली.
India China FaceOff: भारताच्या ३८००० चौरस किलोमीटर जमिनीवर चीनचा अवैध कब्जा- राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 3:59 PM