लेह : माझे आजोबा गुलाम रसूल गलवान यांनी १८९० मध्ये गलवान खोऱ्याचा शोध लावला. या खो-यावर चीनचा दावा हा निराधार आहे, असे मत मोहम्मद अमीन गलवान यांनी व्यक्त केले. ते गुलाम रसूल गलवान यांचे नातू आहेत. गलवान खो-याशी आपल्या कुटुंबियांचे असलेले नाते आणि या खो-याला गलवान असे नाव कसे पडले याबाबत बोलताना मोहम्मद अमीन गलवान म्हणाले की, माझ्या आजोबांनी इंग्रजांसोबत १८९२-९३ मध्ये गलवान खो-याचा दौरा केला. गलवान नाला हा नवा रस्ता बनविला. त्यानंतर इंग्रजांनी माझ्या आजोबांच्या नावाने या भागाला ‘गलवान’ असे नाव दिले. चीन या भागावर दावा करीत आहे, याबाबत विचारले असता मोहम्मद अमीन गलवान म्हणाले की, हे खोरे भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील.
India China FaceOff: गलवानवरील चीनचा दावा निराधार, मोहम्मद अमीन गलवान यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 3:52 AM