नवी दिल्लीः लडाखमधील संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाल्यानं देशभरात चीनविरोधात संताप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेत सुमारे 43 चिनी सैनिक ठार झालेत. चिनी सैनिकांच्या या भयानक कृत्याचा देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट करत देशासाठी आपले प्राण देणा-या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे.आपल्या ट्विटमध्ये माजी काँग्रेस अध्यक्षांनी लिहिले होते की, 'देशातील शूर शहिदांना माझा सलाम. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसह एक व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडीओत ते म्हणतात, दोन दिवसांपूर्वी भारताचे 20 जवान शहीद झालेत. आमची जमीनही चीननं ताब्यात घेतली. पंतप्रधान (पंतप्रधान नरेंद्र मोदी) तुम्ही गप्प का आहात? तू कुठे लपून बसला आहात? बाहेर या, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे आहोत. बाहेर या आणि देशाला सत्य सांगा, घाबरू नका, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
हेही वाचा
CoronaVirus News: "अखेर सत्य पुढे आलेच"; कोरोनाबळींचा आकडा वाढला, फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला!
CoronaVirus: डॉक्टरांच्या लढ्याला मोठं यश! 'या' औषधानं व्हेंटिलेटरवरचे रुग्णही झाले ठणठणीत
India China Faceoff : मोदी सरकारनं चीनचा बदला घ्यावा, जवान शहीद झाल्यानं ओवैसी संतप्त
दौलत बेग ओल्डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती