नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये चीनशी झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले. त्यानंतर चीनविरोधातभारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. भारताची एकही इंच जमीन कोणाच्याही ताब्यात नाही तसेच कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले. तसेच भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करू नये. चीनने तसा प्रयत्न केल्यानंतर भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
शहीद झालेल्या 20 जवानांच्या मृत्यूवरून देशातील राजकारण तापलं आहे. याच दरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये जखमी झालेल्या एका जवानाच्या वडिलांनी राहुल गांधी यांना राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. 'भारतीय लष्कर सक्षम आहे. ते चीनचा पराभव करू शकतात. राहुल गांधी यांनी यामध्ये राजकारण करू नये. माझा मुलगा लष्करात लढला आणि यापुढेही लढत राहिल' असं जखमी जवानाच्या वडिलांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
दिल्लीत आयोजिलेल्या व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करू नये. चीनने तसा प्रयत्न केल्यानंतर भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सीमेपलीकडून येणाºया आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कराला योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार सरकारने दिले आहेत. त्याचबरोबर राजनैतिक पातळीवरून भारताने आपली ठाम भूमिका चीनच्या कानावर घातली आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी सर्व भारतीय कटिबद्ध आहेत हेच सर्वपक्षीय बैठकीतील चर्चेतून दिसून आले. भारताची कुरापत काढण्याचा कोणी विचारही करू नये असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. तर दुसरीकडे देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी तर आपल्या फोनमधून चीनी अॅप्स देखील हटवून याची सुरुवात केली आहे. अनेक उद्योजकांनी देखील ई-कॉमर्स कंपन्यांनी चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंची विक्री करण्याची बंदी घालावी अशी मागणी केली आहे. भारतीयांनी जर ठरवलं तर चीनला 17 अब्ज डॉलरचा झटका बसू शकतो. चीनमधून भारतात होणाऱ्या एकूण आयातीमधील रिटेल ट्रेडर्स जवळपास 17 अब्ज डॉलर इतके आहे. यामध्ये खेळणी, घरातील वस्तू, मोबाईल, इलेक्ट्रिक सामान आणि कॉस्मॅटिक उत्पादनांचा समावेश आहे. चीनमधून येणाऱ्या या वस्तू बंद झाल्या तर संबंधित वस्तूंची भारतात निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना फायदा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Solar Eclipse 2020 : 'कंकणाकृती' सूर्यग्रहण पाहायचंय? मग 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी
इच्छाशक्तीची गरज! भारत चीनला देऊ शकतो तब्बल 17 अब्ज डॉलरचा जबरदस्त झटका
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्यात 'हे' औषध प्रभावी ठरणार; संक्रमण रोखण्यास मदत करणार
"सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या हातात काठी देता, ती काय RSS ची शाखा आहे का?"