नवी दिल्लीः भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखजवळच्या LACवरून वाद सुरू आहे. चिनी सैन्य आणि भारतीय लष्करामध्ये झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान आज शहीद झाले. त्यानंतर लागलीच मोदी सरकारनं हालचाली वाढवल्या असून, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण सेवा प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्यासह तीन सेना प्रमुखांची बैठक घेतली आहे.या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरही उपस्थित आहेत. विशेष म्हणजे लडाख सीमेवर भारत आणि चीनमधील वाद बर्याच काळापासून सुरू आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात एक हिंसक झडप झाली. या चकमकीत भारतीय लष्कराचे अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. सोमवारी रात्री गलवान खो-यात दोन्ही देशांच्या सैन्य अधिका-यांमध्ये चर्चा सुरू असताना ही घटना घडली.काय आहे संपूर्ण प्रकरण?भारत-चीन सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. चीन सातत्याने असे म्हणत आहे की, हे प्रकरण चर्चेच्या माध्यमातून सोडवायचे आहे, परंतु सैन्य माघारी घेण्यास तयार नाही. चिनी सैनिकांना माघार घ्यावी लागेल, असे भारताने स्पष्ट केले होते. एलएसीवरील बदललेली परिस्थिती भारत कधीही स्वीकारणार नसल्याचंही मोदी सरकारनं स्पष्ट केलं होतं.
India China Faceoff: LACवरच्या चकमकीनंतर मोदी सरकार ऍक्शनमध्ये; राजनाथ सिंहांनी तिन्ही सैन्यदलांची बोलावली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 2:47 PM