शहरं
Join us  
Trending Stories
1
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
2
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
3
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
4
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
5
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
6
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
7
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
8
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
9
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
10
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
11
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
12
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
13
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
14
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
15
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
16
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
17
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
18
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
19
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?

चीनला करारा जवाब देण्यासाठी भारत सज्ज; LAC वर घातक IBG तैनात करणार, काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 9:28 AM

सध्या भारतीय लष्कराच्या ९व्या आणि १७व्या दोन तुकड्या तीन वर्षांपासून IBG वर सराव करत आहेत

नवी दिल्ली - LAC वर चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर नव्या रणनीतीवर काम करत आहे. या अंतर्गत लष्कराचा IBG म्हणजेच इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप LAC वर तैनात केला जाईल. या गटात लष्कराच्या विविध फिल्डवरील तरबेज सैनिक असतील. यामध्ये पायदळ, रणगाडे, तोफगोळे, इंजिनियर्स, लॉजिस्टिक, सपोर्ट युनिटसह ते जवान असतील जे युद्धासाठी आवश्यक असतात. हा सैन्य गट अधिक घातक असेल.  त्यांना सरावाच्या माध्यमातून जास्त उंचीच्या शिखरांमध्ये युद्धासाठी तरबेज केलेले असते. 

भारतीय लष्कराच्या दोन तुकड्यांचा सराव सध्या भारतीय लष्कराच्या ९व्या आणि १७व्या दोन तुकड्या तीन वर्षांपासून IBG वर सराव करत आहेत. मागील वर्षी अशा इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपचं पडताळणी झाली. पडताळणीद्वारे हा लढाऊ गट अधिक प्रभावी कसे होतील याची अनेक सरावांद्वारे चाचणी केली गेली आहे. त्यानंतरच त्यांना मान्यता देण्यात आली आहे. आता आयबीजी बनवण्यासाठी सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. आदेश मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत लष्कर LACवरील आपल्या नव्या रणनीतीवर काम करण्यास सुरुवात करेल.

अरुणाचलमध्ये पहिली चाचणीअरुणाचल प्रदेशमध्ये अशा प्रकारच्या इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपची प्रथमच चाचणी घेण्यात आली होती. २०१९ मध्ये, भारतीय सैन्याने अरुणाचलमध्ये १५ हजार फूट उंचीवर 'हिम विजय' नावाचा सराव केला. यादरम्यान भारतीय लष्कर नव्या रणनीतीने शत्रूचा कसा मुकाबला करेल, याची चाचपणी शिखरांवर करण्यात आली. यामध्ये लष्कर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकरात लवकर कसे पोहोचेल, १५ हजार फूट उंचीवर असलेल्या कठीण भौगोलिक परिस्थितीत दळणवळण आणि समन्वय कसा साधेल, हे पाहण्यात आले.

इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप (IBG) ची ही पहिली चाचणी होती. IBG मध्ये ब्रिगेडला थेट कॉर्प्सकडून सूचना मिळतील. या नवीन युद्ध रणनीतीमध्ये कुणीही मध्यस्थी नसेल. यामुळे निर्णय घेणे आणि अंमलबजावणी वेगवान होईल. आयबीजीचे प्रमुख मेजर जनरल असतील. लष्कराच्या ९व्या आणि १७व्या कॉर्प्सने अनेक सरावातून IBG मध्ये प्रभुत्व मिळवले आहे. यापैकी १७ वी कॉर्प्स ही माउंटन स्ट्राइक कॉर्प्स आहे. इंटिग्रेटेड केल्याने हा ग्रुप शत्रूसाठी अधिक घातक बनतो. ज्यामध्ये सैन्याची सर्व क्षेत्रे आणि सेवा भाग घेतात. त्यात पायदळ, अभियंते, तोफखाना, हवाई संरक्षण, लष्करी विमान वाहतूक, त्यांची हल्ला करणारे हेलिकॉप्टर आणि भारतीय हवाई दलाची विमाने यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन