लेह - भारतीय हावाई दलाची लढाऊ विमानं चीनच्या सीमेजवळ सातत्याने उडताना दिसत आहेत. यात रशियन Su-30MKI आणि MiG-29s या विमानांचाही समावेश आहे. एएनआयच्या चमूने फॉर्वर्ड एअरबेसचा दौरा केला, तेव्हा तेथे Ilyushin-76 आणि Antonov-32 बरोबरच अमेरिकन C-17 आणि C-130J यांच्यासह परिवहन विमानंही दिसून आली.
या परिवहन विमानांच्या सहाय्याने सीमेवर तैनात असलेले जवान आणि साहित्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले किंवा आणले जाते. यातील अपाचे हे प्रमुख्य आहे. कारण, ते पूर्व लडाख भागात सातत्याने सैनिकांच्या सेवेत आहे.
आकस्मिक परिस्थितीचा सामाना करण्यासाठी महत्वाचे तळ -यावर्षी मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये LAC वर चीनने सैन्य तैनाती वाढवल्यानंतर, चिनूक या भागांत तैनात करण्यात आले. ते चीन सीमेवर भारताची युद्ध तयारी सक्षम करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत.
फॉरवर्ड एअरफिल्डसंदर्भात विचारण्यात आले असता, फ्लाइट लेफ्टनन्ट म्हणाले, "या भागात कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन करण्यासाठी हे बेस अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. हे बेस कुठल्याही आकस्मिक स्थितीचा सामा करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या सपोर्ट ऑपरेशन्ससाठी अत्यंत महत्वाचे आहे.
"भारतीय हवाई दल पूर्णपणे तयार" -एअरबेसवर तैनात असलेल्या एका विंग कमांडरने सांगितले, की "भारतीय हवाई दल ऑपरेशनसाठी आणि सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आज युद्धामध्ये हवाई तागदीला सर्वाधिक महत्व आहे."
महत्त्वाच्या बातम्या -
Photo : डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या गर्लफ्रेंडला Corona, अशी आहे ग्लॅमरस
...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!
CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...