नवी दिल्ली: भारत आणि चिनी सैन्यात काल कमांडर स्तरावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली आहे. दोन्ही देशांमध्ये सैन्य माघारी घेण्यावर एकमत झालं. पूर्व लडाखमध्ये वादग्रस्त जागांवरून सैन्य मागे घेण्याबद्दल चर्चा झाली असून दोन्ही बाजू याची अंमलबजावणी करतील, असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काल भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठक झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे चीनच्या हद्दीत येणाऱ्या मोल्डो भागात ही बैठक पार पडली. तब्बल १२ तास चाललेल्या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत झाल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली आहे. सीमेवरून सैन्य मागे घेण्यास चीन तयार आहे. त्यामुळे भारतही आपले जवान मागे घेईल, असं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.
India China Faceoff: मोठी बातमी! चीन पूर्व लडाखमधून माघार घेण्यास तयार; भारताला यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 13:08 IST
भारत आणि चीनमधील चर्चा सकारात्मक, सैन्य मागे घेण्यावर एकमत; लष्कराची माहिती
India China Faceoff: मोठी बातमी! चीन पूर्व लडाखमधून माघार घेण्यास तयार; भारताला यश
ठळक मुद्देदोन्ही देशांमध्ये काल ११ तास कमांडर स्तरावरील चर्चाबैठकीत सैन्य माघारी घेण्याबद्दल एकमतपूर्व लडाखमधील तणाव निवळण्याची शक्यता