नवी दिल्ली: गेल्या सहा महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव अद्यापही संपलेला नाही. एका बाजूला शांततेची भाषा करणारा चीन दुसऱ्या बाजूला मात्र सीमावर्ती भागातील आपली ताकद वाढवत आहे. त्यामुळे समेट घडवण्यासाठी सुरू असलेल्या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतानंदेखील सीमेवरील फौजफाटा वाढवला आहे. चीनच्या कुरघोड्यांना उत्तर देण्याची तयारी भारतानं सुरू ठेवली आहे.चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्करानं आता ड्रॅगनच्याच रणनीतीचा आधार घेतला आहे. चीनचा प्रत्येक हल्ला निष्प्रभ करण्यासाठी लडाखमध्ये 'टनल डिफेन्स' तैनात केला आहे. हिंदुस्तान टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. चीननं जपानविरुद्धच्या युद्धात 'टनल डिफेन्स' व्यूहनीतीचा वापर केला होता. त्यात चीनला चांगलं यशदेखील मिळालं होतं.चिनी लष्कराच्या त्यांच्याच प्लाननं प्रत्युत्तरचिनी सैन्यानं ल्हासा विमानतळावर विमानं तैनात करण्यासाठी बोगदे तयार केले आहेत. याशिवाय दक्षिण चिनी समुद्रात अण्वस्त्रवाहू पाणबुड्या ठेवण्यासाठी हैनान बेटांवर जमिनीखाली तयारी सुरू केली आहे. भारतानं याच व्यूहनीतीचा आधार घेत काँक्रिटचे मोठे बोगदे तयार केले आहेत. त्यांची रचना मोठ्या पाईप्ससारखी आहे. Hume काँक्रिट बोगद्यांमुळे शत्रूच्या हल्ल्यापासून सैन्याचं रक्षण करता येतं. याशिवाय संकटसमयी हल्लादेखील करता येऊ शकतो.Hume काँक्रिट पाईप्सचं वैशिष्ट्य काय?Hume पाईप्सचा व्यास ६ ते ८ फूट इतका असतो. या पाईप्समधून जवान एका भागातून दुसऱ्या भागात जाऊ शकतात. यामुळे शत्रूच्या गोळीबारापासून जवानांचा बचाव होतो. बाहेरचं वातावरण अतिशय थंड असलं तरीही पाईप गरम ठेवले जाऊ शकतात. हिमवृष्टी सुरू झाल्यास, वादळ आल्यास जवान या पाईप्समध्ये आसरा घेऊ शकतात.
India China Faceoff: चीनला त्यांच्याच रणनीतीनं चीतपट करण्याचा डाव; जमिनीखाली चक्रव्यूह तयार
By कुणाल गवाणकर | Published: November 22, 2020 5:25 PM