नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चुमारमध्ये चीनने घुसखोरीचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताचा भारतीय लष्कराने इन्कार केला असला तरी हा देश सातत्याने करीत असलेल्या आगळीकीला रोखण्यासाठी भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशलगतच्या सीमेवर व पेंगाँग सरोवराच्या परिसरातील गस्त अधिक कडक केली आहे.लडाखमधील चुमार येथे चिनी लष्कराच्या हालचालींना घुसखोरी म्हणता येणार नाही. शांतताकाळात सैन्याच्या अशा हालचाली सुरू असतात, असे भारताने म्हटले आहे. हद्दीवर असलेल्या पेंगाँग तलाव परिसरातील जैसे थे स्थिती बदलण्याचा चीनचा प्रयत्न हाणून पाडण्याचे भारताने ठरविले आहे. तेथील स्थितीचा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आढावा घेतला असून इथे जवानांना आक्रमक पवित्रा घ्यावा, असा आदेश दिला आहे.नवी दिल्ली : ईशान्य लडाख सीमेवरून भारतीय हद्दीत घुसखोरीचा चिनी सैनिकांचा डाव हाणून पाडल्यानंतर या भागातील तणाव अजूनही कायम आहे. भारतीय जवान आपल्या जागेपासून तसूभरही मागे हटले नसून सलग तिसऱ्या दिवशी भारत-चीनदरम्यान कमांडर स्तरावरील चर्चा पार पडली. अद्याप चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नसले तरी भारताने पुन्हा एकदा ड्रॅगनला झटका दिला आहे. माहिती व दूरसंचार मंत्रालयाने पबजीसह चीनच्या अनेक अॅप्सवर बंदी घातली आहे.चिनी सैनिकांची कोंडीपेंगाँग सरोवराच्या दक्षिण बाजूला असलेल्या पर्वतशिखरांवर भारतीय जवान आता पाय घट्ट रोवून उभे आहेत. त्यामुळे घुसखोरी करण्याची संधी शोधणाºया चिनी सैनिकांची कोंडी झाली आहे. पेंगाँग सरोवर परिसरात भारतीय हद्दीत लष्कराने रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे, रणगाडे हेही आता तैनात केले आहेत.संरक्षणमंत्री चीनशी करणार नाही चर्चाकेंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीसाठी रशियाच्या तीन दिवसांच्या दौºयावर बुधवारी रवाना झाले. एससीओची बैठक शुक्रवारपासून मॉस्को येथे होणार आहे. या दौºयात संरक्षणमंत्री राजनाथसिंह चिनी मंत्री किंवा अधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा करणार नाहीत.चीन हा देशात व देशाबाहेरही सध्या अत्यंत आक्रमक भूमिका घेत आहे. चीनचे वर्तन अस्वस्थ करणारे आहे. भारत व चीनच्या सीमेवरील स्थितीवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.
India China FaceOff: चीनची घुसखोरी उधळण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज, पेंगाँग सरोवर, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर क्षेपणास्त्रेही तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 6:11 AM