शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

India China FaceOff: पँगाँग सरोवर परिसरात लष्कराने मजबूत पाय रोवले, भारताच्या जवानांनी चिन्यांना चहुबाजूंनी घेरले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 6:13 AM

पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात चीनने जैसे थे परिस्थिती बदलण्याच्या केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच या भागात आक्रमक राहण्याची सूचना केली आहे.

ठळक मुद्देपँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील चारी बाजूला असलेल्या पर्वतांवर भारतील लष्कराने पाय रोवले या भागात घुसण्याचा प्रयत्न करत असलेल्या चीनची कोंडी झालीपँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात भारताने अतिरिक्त जवानांना तैनात केले

लेह (लडाख) - गेल्या चार महिन्यांपासून लाडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. पँगाँग सरोवर परिसरात चिनी सैन्याच्या घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आता या भागात भारतीय लष्कराने आक्रमक धोरण अवलंबले आहे. तसेच पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात चीनने जैसे  थे परिस्थिती बदलण्याच्या केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच या भागात आक्रमक राहण्याची  सूचना केली आहे.दरम्यान, लडाखमधील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील चारी बाजूला असलेल्या पर्वतांवर भारतील लष्कराने पाय रोवले आहेत. त्यामुळे या भागात घुसण्याचा प्रयत्न करत असलेल्या चीनची कोंडी झाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात भारताने अतिरिक्त जवानांना तैनात केले आहे. तसेच टँक, अँटीटँक गाइडेड क्षेपणास्रे मोर्चावर आणली आहेत. दरम्यान, २९ आणि ३० ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या झटापटीत पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागात चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बदलण्याचा करण्यात आलेला प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली होती.दोन्ही देशांचे कमांडर दोन दिवसांपूर्वी या भागात निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चर्चा करत असताना चिनी सैन्याकडून मात्र घुसखोरीचा प्रयत्न करून आगळीक करण्यात आली, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बीपीन रावत, लष्कर प्रमुख एमएम नरवणे आणि हवाईदलप्रमुख आर. के. एस. भदौरिया उपस्थित होते.दरम्यान, या घटनेनंतर चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला आमच्याशी कोणतीही स्पर्धा करायची असल्यास त्यांना १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागेल, असा इशारा ग्लोबल टाईम्सने दिला आहे.भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याचे घुसखोरीचे मनसुबे उधळले गेले. लडाखमधल्या पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्याजवळ भारत आणि चीनचे जवान भिडले. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याला घुसखोरी करता आली नाही. यानंतर चीन सरकारने पुन्हा एकदा बातचीत करून प्रश्न सोडवण्याची भाषा सुरू केली. तर चिनी सरकारच्या ग्लोबल टाईम्सने भारताला थेट धमकी दिली आहे.ह्यभारतानं चिनी सैन्याला आधीच रोखले, असे भारताने म्हटले आहे. त्यामुळे भारतानेच आधी विध्वंसक पाऊल उचलले आणि संघर्षाची सुरुवात केली, हे स्पष्ट आहे. भारतामध्ये अनेक समस्या आहेत. रविवारी भारतात ७८ हजार कोरोना रुग्ण आढळले. त्यांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील तणाव वाढवून भारत देशातील समस्यांवरून लक्ष विचलित करू पाहतोय,' असे ग्लोबल टाईम्सने संपादकीय लेखात म्हटले आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवानladakhलडाखchinaचीन