नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील तणाव कायम आहे. या भागातील पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर ७ सप्टेंबरला गोळीबार झाल्याची घटना घडली. यासाठी चिनी सैन्यानं भारतीय लष्कराला जबाबदार धरलं. यानंतर भारतीय लष्करानं चिनी सैन्याच्या दाव्याची पोलखोल केली आहे. आम्ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडलेली नाही, गोळीबारही केलेला नाही. उलट चिनी सैन्यच बातचीत सुरू असताना कराराचं वारंवार उल्लंघन करत आहे, असं भारतीय सैन्यानं स्पष्ट केलं आहे.लडाखमध्ये तणाव वाढला, चिनी सैन्याने गोळीबार केला, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर७ सप्टेंबरला झालेल्या गोळीबारावरून भारतीय सैन्यानं स्पष्टीकरण दिलं आहे. 'चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या आमच्या चौकीजवळ येण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय जवानांनी त्यांना मागे हटण्यास सांगितलं. मात्र त्यांनी भारतीय जवानांना घाबरवण्यासाठी गोळीबार केला. चिनी सैन्यानं भारतीय जवानांना चिथावण्याचे प्रयत्न केले. मात्र तरीही भारतीय जवानांनी संयम राखला आणि अतिशय जबाबदारीनं प्रकरण हाताळलं,' असं सैन्यानं म्हटलं आहे.बेलगाम ड्रॅगनच्या मुसक्या कोण आवळणार?भारतीय सैन्यासोबतच केंद्र सरकारनंदेखील याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. चीनची वागणूक अतिशय दुटप्पी असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. 'भारत सरकार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी प्रय्तन करत असताना चीन जाणूनबुजून भारतीय सैन्याला चिथावण्याचे प्रयत्न करत आहे. भारतीय सैन्याकडून गोळीबार झालेला नाही,' असं सरकारनं अतिशय स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे.चीनशी लढण्यासाठी स्पेशल फ्रंटियर फोर्स; छुप्या कारवायांसाठी माहीरपँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांनी गोळीबार केल्याचा आरोप चीननं सोमवारी मध्यरात्री केला. ७ सप्टेंबरला भारतीय जवानांनी गोळीबार केल्याचा दावा चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या कमांडरनं केला. बातचीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिनी बॉर्डर गार्डला इशारा देण्यासाठी भारतीय जवानांनी गोळीबार केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चिनी सैन्यानं आवश्यक पावलं उचलली, असा दावा चीनकडून करण्यात आला.