नवी दिल्ली : सैन्य मागे घेण्याबाबत भारत व चीन यांच्यात एकमत झाल्यानंतरही चीनने सीमेपाशी मोठ्या प्रमाणात सैन्य आणून ठेवल्याने आणि त्यांची लढाऊ विमाने लडाख भागात घिरट्या घालू लागल्याने भारतानेही सीमा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जवानांची कुमक वाढवली आहे. लेहमध्ये हवाई दलाच्या विमानांमार्फत जवानांच्या तुकड्या उतरल्या आहेत. चीनवर विश्वास न ठेवता, आता पूर्ण युद्धसज्जता ठेवण्याच्या दृष्टीने भारताने पावले उचलायला सुरुवात केली आहे.प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गलवान खोऱ्यात तसेच हॉटस्प्रिंग, कोयुल, फुकचे, मुरगे, डेपसाँग चिनी सैन्याकडून पुन्हा धोका होण्याची शक्यता असल्याने भारताने त्या भागात मोठ्या प्रमाणात जमवाजमव सुरू केली आहे. दुसरीकडे चीनने होतान, ग्यारी व शिगत्से या भागात लढाऊ विमाने, बॉम्बर्स आणल्याने भारताने त्या भागात हाय अॅलर्ट जारी केला आहे.चीनने कागाळी केली, तर त्यास अधिक आक्रमकपणे उत्तर देण्याचा भारताचा प्रयत्न असेल, असे त्यातून स्पष्टपणे जाणवत आहे. या घटनांमुळे सैन्यमाघारीवर सहमती झाल्याला फारसा काही अर्थ राहिला नसल्याचे स्पष्ट होते. अर्थात चीनने घेतलेल्या पवित्र्यामुळे आणि त्या देशावर आता विश्वास राहिला नसल्याने भारताची तिन्ही दले आता तिथे सज्ज झाली आहेत.>‘१५ जून’ची पुनरावृत्ती नकोदोन्हीकडून लष्करी कुमक, हवाई दलाचे जवान व युद्धसाहित्य आणण्यात आल्याने तिथे सध्या तणावाचे वातावरण आहे. तणाव असला तरी १५ जूनच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, अशी काळजी सध्या दोन्ही बाजू घेत आहेत.>गलवान खो-यात कॅम्पभारत आता चीनच्या चर्चेला भुलणार नाही. गलवान खोरे, पँगाँग नदी परिसरात मोठा फौजफाटा आहे. आॅक्टोबरपर्यंत त्यात वाढ करण्यात येईल.तोपर्यंत जवानांसाठी आवश्यक सोयीसुविधा असलेल्या कँप इथे उभारला जाईल. कडाक्याच्या थंडीसाठी लागणारा पोशाखही खरेदी केला जाणार आहे.लष्करी सामार्थ्यवृद्धीसाठी खरेदी तर फिलिपिन्स, इंडोनेशिया, श्रीलंका, आॅस्ट्रेलिया आदींसोबत लढाऊ नौका अभ्यासाचा प्रस्ताव तयार केला जाईल.भारताच्या सुखोई-२0 एमकेआय, मिग-२000 व जग्वार फायटर्स विमानांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या आहेत.
India China Faceoff: भारतीय जवान सीमेवर सज्ज; लढाऊ विमानांच्याही हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 6:21 AM