नवी दिल्लीः भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखजवळच्या LACवरून वाद सुरू आहे. चिनी सैन्य आणि भारतीय लष्करामध्ये झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान आज शहीद झाले. त्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण सेवा प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्यासह तीन सेना प्रमुखांची बैठक घेतली. आता राजकीय नेत्यांकडूनही भारतीय जवान शहीद झाल्यानं चीनचा बदला घेण्याची भाषा बोलली जात आहे.लडाखच्या गलवानमध्ये चीनबरोबरच्या चकमकीत शहीद झालेल्या ३ योद्ध्यांबरोबर भारत उभा आहे. एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाता कामा नये, या हत्येचा सूड घेतला जावा, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी दिली आहे.
हेही वाचा
दौलत बेग ओल्डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती
...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे, जिथे आज सैनिकांमध्ये झाली झटापट
CoronaVirus News: आजच्या घडीला मुंबईत यायची माझी हिंमत नाही, पण...; नितीन गडकरींची 'मन की बात'
आपत्तीत संधी! योगी आदित्यनाथ दीड लाख प्रवासी मजुरांना देणार जॉबचं ऑफर लेटर
CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली