नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्याच्या प्रदेशावर आमचेच असल्याचे सांगून चीनने पुन्हा दगाबाी सुरू केली आहे. तसेच त्या भागात पुन्हा बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. चीनचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे.लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील हा तणाव निवळावा म्हणून भारताच्या परराष्ट्र खात्यातील पूर्व आशिया विभागाचे सहसचिव नवीन श्रीवास्तव व चीनचे परराष्ट्र महासंचालक वू जियांघाव यांच्यात बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. त्यावेळी चीनने तो भाग आपलाच असल्याचे रडगाणे गायला सुरुवात केली.पूर्व लडाख सीमेवर संघर्ष होऊन तणावास कारणीभूत ठरलेल्या वादग्रस्त ठिकाणांहून सैन्य माघारी घेण्यावर भारत व चीन यांच्यात मंगळवारीच सहमती झाली होती. त्यामुळे तणाव निवळेल असे वाटत होते. पण त्या भागात चीनने बांधकाम सुरूच ठेवले असल्याचे आढळून आले. त्यामुळे गलवान खोरे हा भारताना अविभाज्य भाग असून, तेथील बांधकाम ताबडतोब बंद करावे, असे भारतातर्फे या चर्चेत सांगण्यात आले. गलवान खोºयावर हक्क सांगण्याची भूमिका चीनने कायम ठेवल्यामुळे हा गुंता इतक्यात सुटण्याची चिन्हे नाहीत.
>जवानांचे कौतुकफुद्धकाळात आणि एरवीही अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या आणि कृतीद्वारे सीमेपलीकडील दहशतवादी वा अन्य राष्ट्रांच्या कारवायांना सडेतोड उत्तर देणाºया शूर जवानांचे कौतुक करण्याची भारतीय लष्करामध्ये परंपरा आहे. त्याप्रमाणे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आज लडाखमधील बहाद्दूर जवानांना शाबासकी दिली आणि त्यांना प्रशस्तीपदकही दिले.