नवी दिल्ली -भारत-चीनदरम्यान गेल्या काही आठवड्यांपासून सीमेवर तणाव सुरू आहे. मात्र, आता हा तणाव निवळत असल्याचे संकेत मिळत आहेत. चिनी सेन्य गलवान खोऱ्यातून आता जवळापस एक ते दोन किलो मीटर मागे हटले आहे. राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांनी रविवारी चिनी परराष्ट्रमंत्री वान्ग यी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये सहमती झाली.
चिनी सैन्याने माघार घेतली. यात अनेक राजकीय आणि मुत्सद्दी डावपेच कामी आले. याचा क्रमशः विचार केला, तर भारताने सीमेवर मोठ्या प्रमाणावर आपले सैन्य वाढवले, फायटर प्लेन तयार केले, चीनविरोधात संपूर्ण जगात वातावरण निर्मिती केली, अमेरिकेसह अनेक देशांची चीनविरोधात वक्तव्ये आली, स्वतः पंतप्रधान लडाखमध्ये गेले, यापूर्वी लष्कर प्रमुखांनी लडाखचा दोरा केला, दुसरीकडे चर्चा सुरूच होती, अनेकदा उचकवण्याचा प्रयत्न होऊनही पंतप्रधानांनी चीनचे नावही घेतले नाही, यामुळे चर्चेचा दरवाजा खुला राहिला, अनेक अॅपवर बंदी घातली आणि अनेक चिनी कंपन्यांचे टेंडर रद्द करून दाखवून दिले, की भारत या मुद्द्यावर मागे हटणार नाही. परिणामी, प्रकरण वाढवले, तरी फायदा होणार नाही, हे चीनच्या लक्षात आले.
पंतप्रधानांचा लडाख दौरा -पंतप्रधानांनी नुकताच लडाख दौरा करत सैनिकांचे मनोबल वाढवले. यावेळी चीनचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी, हे यूग विस्तारवादाचे नाही, विकासवादाचे आहे, असे म्हणत चीनवर जबरदस्त घणाघात करत थेट इशारा दिला. यावेळी ते म्हणाले होते, आम्ही श्रीकृष्णाच्या बासरीला आणि त्यांच्या सुदर्शन चक्रालाही आदर्श मानतो. यावेळी त्यांनी लडाखमधील जखमी जवानांचीही भेट घेतली होती. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 11 हजार फूट उंचावरील निमूलाही भेट दिली. जेथून पाकिसतान आणि चीन दोघांचाही एकाच वेळी सामना केला जाऊ शकतो.
चिनवर अॅप्सबंदी करून मोठा वार -चीन सोबतच्या तणावातच मोदी सरकारने मोठे पाऊल उचलत 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे चिनी कंपन्या आणि चीनला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसेल, असे जाणकारांचे मत आहे.
आर्थिक पातळीवर फटका - भारत चीनला आर्थिक स्तरावर सातत्याने फटके देत आहे. आता, भारत सर्व चीनी कंपन्यांना हायवे प्रोजेक्ट्ससाठी बॅन करण्याची तयारी करत आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी चिनी कंपन्यांना दिलेले रेल्वेचे अनेक ठोकेही रद्द करण्यात आले आहेत. तसेच यासंदर्भातील नवा निर्णय सद्य स्थितीतील आणि भविष्यातीलही सर्व प्रोजेक्ट्ससाठी लागू असेल.
प्रचंड मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले -याशिवाय भारताने लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे. एवढेच नाही, तर भारताची लढाऊ विमानंही चीनवर नजर ठेऊन आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी
चीनबरोबर युद्धाचा धोका; जपान अन् पश्चिम आशियात हजारो सैनिक पाठवतायत हे दोन 'बलाढ्य' देश
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!
...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?