नवी दिल्ली : मागील आठवड्यात चीनचे मनसुबे उद्ध्वस्त करण्याºया जवानांची यशोगाथा आता बाहेर आली आहे. लद्दाखच्या पूर्वेकडील नियंत्रण रेषेजवळ गलवान खोºयातून चीननेचभारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. जवानांनी तो हाणून पाडला. तीनदा पीएलएच्या सैनिकांना भारतीय जवान भिडले. अर्थात ही माहिती लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.गलवान खोºयात चीनने चौकी उभारली. भारतीय सैनिकांनी आक्षेप घेतल्यावर चौकी पाडून चिनी परतले. काही तासांनी पुन्हा आले. १४ च्या मध्यरात्री पुन्हा हा प्रकार सुरू झाला. चौकी बांधण्यास चिनी सैनिकांनी सुरूवात केली. आपल्या लष्करी तळावरून कर्नल संतोष बाबू थेट चौकीजवळ पोहोचले व चिनी सैनिकांना जाब विचारला. विशेष म्हणजे संतोष बाबू हे सातत्याने चिनी सैनिकांशी त्या आधीपासून चर्चा करीत होते. चौकीजवळ नवे चेहरे पाहताच त्यांच्या लक्षात कट आला नि ते स्वत: चौकी पाडण्यासाठी निधड्या छातीने पुढे सरसावले.चिनी सैनिकांनी चचेर्साठी गेलेल्या संतोष बाबूंवर हल्ला चढवला. दोन्ही बाजूंनी सैनिक एकवटले. साडेतीनशे ते चारशे चिनी सैनिकांना शंभरेक भारतीय जवान भारी पडले. अभिमानास्पद बाब म्हणजे भारतीय जवानांनी लष्करी कराराचे उल्लंघन केले नाही. चिनी सैनिकांनी छुपेपणाने टोकदार तार बांधलेल्या दंडुक्याने मारहाण केली. हा अनपेक्षित वारही जवानांनी छातीवर झेलला. २० जवान अखेरच्या श्वासापर्यंत झुंजले. नांगी ठेचली गेल्यावर अखेर पीएलएच्या सैनिकांचे मनोधैर्य खचले व ते माघारी परतले. त्यांची चौकी जवानांनी उद्ध्वस्त केली. गलवान खोºयात चिनी नामोनिशाण नसल्याची ग्वाही त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांनी दिली. गलवान खोºयावरील चीनचा दावा सांगण्याचा कांगावा भारत आक्रमकपणे नाकारत आहे.>परिस्थितीकडे अमेरिकेचेही लक्षअमेरिकेचे संरक्षण मंत्री माईक पॉम्पियो यांनी चीनविरोधात भारताची पाठराखण केल्यानंतर आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ही गंभीर घटना आहे. आम्ही चीन-भारताशी बोलत आहोत. दुसºया महायुद्धातील विजयाचे ७५ वे वर्ष साजरे करण्यासाठी रशियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होतील. विविध देशांच्या संरक्षण मंत्र्यांना त्यासाठी रशियाने निमंत्रण दिले आहे. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातो.23 जूनला रशिया व चिनी परराष्ट्र मंत्र्यांसमवेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करतील.>चीनमध्येही योग दिन साजराआंतरराष्ट्रीय योगा दिवस चीनमध्येही साजरा झाला. कोविड १९ साथीमुळे यंदा ग्रेट वॉल आॅफ चायनावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र भारतीय दूतावासत अत्यंत उत्साहात सामूहिक योगसाधना करण्यात आली. बीजिंगमधील भारतीय तसेच चिनी नागरिकांनीदेखील त्यात भाग घेतला.
India China FaceOff: रात्र वैऱ्याची; २० जवान अखेरच्या श्वासापर्यंत झुंजले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 3:21 AM