बिजिंग : अमेरिका, भारत, जपानसह अन्य शेजारी राष्ट्रांशी चाललेल्या तणावामध्ये चीनचे नौदल वेगाने जागतिक समुद्रावरील मगरमिठी वाढवू लागली आहे. साऊथ चायना समुद्रावर कब्जा केल्यानंतर आता चीनचे नौदलाचे मोठे लक्ष्य हिंदी महासागर असू शकते. असे झाल्यास या पाणबुड्यांना जिबुती आणि ग्वादर बंदरातूनही मदत मिळू शकते.
अमेरिकेचे नियतकालीक फोर्ब्समध्ये आलेल्या रिपोर्टनुसार हिंदी महासागरात ठिकठिकाणी पाणबुड्या तैनात केल्यास युद्धावेळी युद्धनौकांचे परिचालन आरामात केले जाऊ शकणार आहे. चीनने असे केल्यास जगातील अन्य देशांना खासकरून भारतासाठी चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. सध्या भारताकडे दक्षिण आशियातील सर्वाधिक पाणबुड्या आहेत.
पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या बंदरावर चीनचे साम्राज्यचीनच्या सैन्याने भारतासोबत सुरु केलेली कुरापत पाहता जगभरातील देश चीनच्या नौदलाच्या वाढत्या हस्तक्षेपावरून चिंतेत आहेत. चीन जरीही त्याचे लक्ष साऊथ चायना सी दाखवत असला तरीही भारतासाठी हिंदी महासागर खूप महत्वाचा आहे. चीनच्या पाणबुड्यांनी नुकतीच पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या बंदरांवर हजेरी लावली होती. सध्याच्या शांततेच्या काळात चीनच्या पाणबुड्या हिंदी महासागरात स्ट्रेट ऑफ मलक्काच्या मार्गाने दाखल होऊ शकतात. तसेच उपस्थिती दाखविण्यासाठी त्यांना समुद्राच्या पृष्ठभागावरूनच यावे लागणार आहे.
चीन भारताला केवळ संदेश देण्यासाठी असे करू शकतो. मात्र, जर चीनने त्याची उपस्थिती लपविली तर त्याला युद्धावेळी त्याचा फायदा होणार नाही. चीनच्या पाणबुड्य़ांना हिंदी महासागरात येण्यासाठी मलक्का स्ट्रेटद्वारे कोणाला न समजता जाणे कठीण असल्याचे समजले जात होते. मात्र, यालाही आता दोन पर्याय उपलब्ध झाले आहेत. हिंदी महासागरात घुसण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला सुंडा स्ट्रेट आणि दुसरा लोमबोक स्ट्रेट.
या दोन्ही मार्गावरून जाताना चीनच्या पाणबुड्यांना पकडणे कठीण ठरणार आहे. एकदा का चीनच्या पाणबुड्या हिंदी महासागरात घुसल्या की त्यांना आफ्रिकेतील चीनच्या जिबुती बंदरातील नाविक तळावरून मदत मिळू शकणार आहे. एवढेच नाही तर चीन पाकिस्तानच्या ग्वादर बंदराच्याही एकदम जवळ असणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Unlock 2 ची तयारी सुरु; शाळा, कॉलेज सुरु होणार? मोदी लवकरच निर्णय घेणार
पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित
CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी
चीनच नाही, अमेरिकाही विश्वासघातकी! एकेकाळी भारतावरच हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते