नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवरील तणाव सातत्याने वाढत आहे. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्वांच्या विषयावर चर्चा झाली.
दुसरीकडे, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही एक महत्वाचे ट्विट केले आहे, यात "भारत इतिहासाच्या एका नाजूक वळणावरून जात आहे. आपण एकाच वेळी अनेक दहशतवादी आणि देशाबाहेरील आव्हानांचा सामना करत आहोत. मात्र आपल्याला जी आव्हानं दिली जात आहेत, त्याचां सामना करण्यासाठी आपण दृढ निश्चयी असायला हवे," असे म्हणण्यात आले आहे.
लेह येथे जाऊन पंतप्रधानांनी सैनिकांचे मनोबल वाढवले -पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी अचानकपणे लेहला भेट दिली. यावेळी त्यांनी नीमू येथे लष्कर, एअरफोर्स आणि ITBPच्या जवानांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली आणि त्यांचा उत्साह वाढवला. अशा पद्धतीने लेहला भेट देऊन पंतप्रधान मोदींनी चीनला स्पष्ट इशारा दिला आहे. तसेच भारत सरकार आपल्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लाऊन पूर्ण ताकदीनिशी उभे आहे, हेही पिपल्स लिब्रेशन आर्मीला (PLA) दाखवून दिले आहे. पंतप्रधान लेहला पोहचल्यानंतर सैनिकांनी त्यांना सर्वप्रथम तेथील ताज्या परिस्थितीची माहिती दिली. यानंतर त्यांनी स्वतःच जवानांशी संवाद साधला.
विस्तारवादावर बोलत चीनवर निशाना -मोदी म्हणाले, गेल्या शतकात विस्तारवादी भूमिकेनेच मानवतेचे सर्वाधिक अहित केले आहे. मानवतेचा विनाश करण्याचे काम केले आहे. विस्तारवाद जेव्हा-जेव्हा एखाद्याच्या डोक्यावर स्वार झाला, तेव्हा-तेव्हा त्याने विश्व शांतीला धोका निर्माण केला आहे. इतिहास साक्षी आहे, अशा शक्तींचा नेहमीच नष्ट झाल्या आहेत अथवा त्यांना झुकावे लागले आहे.
ही भूमी म्हणेजे 'वीर भोग्य वसुंधरा' - मोदी - जवानांचे मनोबल वाढवताना मोदी म्हणाले होते, आपल्याकडे म्हटले जाते, 'वीर भोग्य वसुंधरा'. म्हणजे, वीर आपल्या शस्त्राच्या बळावरच मातृभूमीचे संरक्षण करतात. ही भूमी वीर 'भोग्या' आहे. हिचे संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी आपले सामर्थ आणि संकल्प हिमालयाहूनही उंच आहे. हे सामर्थ्य आणि संकल्प, मी आज आपल्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहू शकतो. जवानांच्या शौर्याची गाथा गात मोदी म्हणाले, आपण त्याच भूमीची संतान आहात, जीने हजारो वर्षे अनेक आक्रमक आणि अत्याचार करणाऱ्यांना चोख उत्तर दिले. आपण, बासरी धारण करणाऱ्या श्रीकृष्णाची पूजा करणारे आणि सुदर्शन चक्र धारण करणाऱ्या श्रीकृष्णाला आदर्श मानणारे लोक आहोत.
महत्त्वाच्या बातम्या -
...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!
मोदींच्या 'त्या' एका वक्तव्याने चीनचा 'जळफळाट'; पंतप्रधानांच्या भाषणावर अशी आली 'पहिली' प्रतिक्रिया
CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...
Photo : डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या गर्लफ्रेंडला Corona, अशी आहे ग्लॅमरस