नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील लडाख सीमेवरील तणाव जैसे थे आहे, १५ जूननंतर चीन आणि भारत यांच्यातील संघर्ष तीव्र होऊ नये यासाठी रशियाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. रशिया उघडपणे समोर आला नसला तरी त्यांच्या प्रयत्नाने चीनने १० भारतीय जवानांना सोडलं अन्यथा संघर्ष आणखी वाढला असता अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
इकोनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. यात भारताचे २० सैनिक शहीद झाले, तर चीनमधील बरेच सैनिकही मारले गेले, ज्यांच्याबाबत चीनने अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही. या संपूर्ण घटनेत चीनने १० भारतीय सैनिक पकडले होते. भारतातही काही चिनी सैनिक होते. मग रशियाच्या सांगण्यावरून चीनने जवान सोडण्यास सहमती दर्शविली.
वास्तविक, २३ जून रोजी रशियाने एक बैठक घेतली. त्यात रशिया-भारत-चीन (आरआयसी) परराष्ट्र मंत्री सहभागी होणार होते. पण १५ जूननंतर भारताने स्पष्टपणे सांगितले होते की, अशा परिस्थितीत चीनशी चर्चा करणे शक्य होणार नाही. यावर रशियाने चीनशी बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, तणाव कमी करण्यासाठी चीनने भारतीय सैनिकांना सोडावे. तिन्ही देशांमधील आरआयसी रुळावर उतरू नये, अशी रशियाची इच्छा होती.
आरआयसीनंतर रशियाने निवेदनात म्हटले आहे की, हा वाद मिटविण्यासाठी भारत आणि चीनला तिसर्याची गरज नाही. रशियाने दोन्ही देशांच्या प्रश्नांच्या मध्यस्थी न जाता केवळ शांततेत मुत्सद्दीचा मार्ग स्वीकारला. आरआयसी करण्यामागील हेतू हा होता की भारत आणि चीनमधील संबंध सुस्थितीत रहावेत, जेणेकरून आधीपासून अस्तित्त्वात असलेले करार योग्य प्रकारे पाळले जातील.
चीनच्या सीमेवरची परिस्थिती सामान्य करण्यासाठी गेल्या महिन्यापासून भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. भारत सीमेजवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे बांधकाम करत आहेत त्यामुळे ड्रगन भडकला आहे. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीमुळे दोन्ही देशातील संघर्ष वाढला. चीनने विश्वासघाताने केलेल्या हल्ल्यात भारतीय कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू यांच्यासह २० भारतीय सैनिक ठार झाले. अनेक चिनी सैनिकही मारले गेले, परंतु चीनने ही माहिती दिली नाही.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...अन्यथा होणार कारवाई; लॉकडाऊनचं कठोर पालन करण्यासाठी सरकारचे '७ कलमी' आदेश
कोरोनापाठोपाठ आणखी एका विषाणूचा मानवाला धोका; चीनने केला अलर्ट जारी
रुग्णालयाची धक्कादायक ऑफर; २५०० रुपयांत कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल
हवेच्या माध्यमातून पसरतोय कोरोना?; २३९ वैज्ञानिकांचा मोठा दावा, WHO ला पाठवलं पत्र
भजी विकणाऱ्या तरुणानं जग जिंकलं; वाचा धीरुभाई अंबानींची यशस्वी गाथा