नवी दिल्लीः भारत हा शांतीपूर्ण देश आहे. आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारतानं कधीच कोणावर आक्रमण केलेलं नाही. आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम आहोत. शहीद झालेल्या जवानांनाही गर्व असेल की, त्यांना संघर्षात वीरमरण आलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला आहे. मोदींनी शहिदांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. आम्ही नेहमीच शेजाऱ्यांबरोबर को-ऑपरेटिव्ह आणि फ्रेंडली पद्धतीनं काम केलं आहे. नेहमीच त्यांच्या विकास आणि कल्याणाची इच्छा केली आहे. जिथे मतभेद असतील तेसुद्धा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून मतभेद राहू नयेत. मतभेद वादामध्ये बदलू नये. आम्ही कधीच कोणाला उकसवलं नाही. तसेच आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही. जेव्हा कधी वेळ आली तेव्हा आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यासाठी शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. आपले जवान मारता मारता शहीद झाले आहेत याचा देशाला अभिमान आहे. आमच्या क्षमता वेळोवेळी आम्ही सिद्ध केलेल्या आहेत. त्याग हे आमच्या राष्ट्रीय चारित्र्याचा भाग आहे. त्याचबरोबर विक्रम आणि वीरतासुद्धा आमच्या देशाच्या चारित्र्याचा भाग आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.
हेही वाचा
India China Faceoff: भारत-चीन सैन्यातील हिंसक झटापटीनंतर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
India China Faceoff: मोदीजी बाहेर या, कुठे लपून बसला आहात?, राहुल गांधींचा हल्लाबोल
CoronaVirus News : आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन द्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
CoronaVirus News: "अखेर सत्य पुढे आलेच"; कोरोनाबळींचा आकडा वाढला, फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला!
CoronaVirus: डॉक्टरांच्या लढ्याला मोठं यश! 'या' औषधानं व्हेंटिलेटरवरचे रुग्णही झाले ठणठणीत
India China Faceoff : मोदी सरकारनं चीनचा बदला घ्यावा, जवान शहीद झाल्यानं ओवैसी संतप्त
दौलत बेग ओल्डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती