India China FaceOff: देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी पंतप्रधान मोदींनी राजधर्माचे पालन करावे- काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 02:55 AM2020-06-21T02:55:18+5:302020-06-21T06:24:50+5:30

India China FaceOff: पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारताचा भाग त्या देशाला सुपूर्द केला आहे.

India China FaceOff: For the security and integrity of the country, Prime Minister Modi should follow the rule of law - Congress | India China FaceOff: देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी पंतप्रधान मोदींनी राजधर्माचे पालन करावे- काँग्रेस

India China FaceOff: देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी पंतप्रधान मोदींनी राजधर्माचे पालन करावे- काँग्रेस

googlenewsNext

नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनसमवेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा व अखंडतेसाठी राजधर्माचे पालन करावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. गलवान खोऱ्यातील तणावाबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दिलेले निवेदन म्हणजे सत्य झाकण्याचा तोकडा प्रयत्न असल्याची टिप्पणीही केली आहे.
लडाखबाबत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारताचा भाग त्या देशाला सुपूर्द केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, सर्वप्रथम पंतप्रधान व सरकारने गलवान खोºयाबाबत आपले धोरण स्पष्ट करण्याची गरज आहे. गलवान खोरे भारताचा भाग नाही का? सरकार गलवान खोºयावरील चीनच्या दाव्याला ठोसपणे का नाकारत नाही? त्या खोºयात चिनी सैनिक असतील तर ते घुसखोर नाहीत का? पेंगकाँग त्सो भागातील चिनी घुसखोरांबाबत सरकारने मौन का बाळगले आहे? पंतप्रधानांना आमचे गांभीर्यपूर्वक आवाहन आहे की, त्यांनी राजधर्माचे पालन करावे. तसेच देशाची सुरक्षा व अखंडतेसाठी ठोसपणे मुकाबला करावा.
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीतील निवेदनाबाबत टिष्ट्वट केले. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी चिनी आक्रमकतेसमोर झुकून भारतीय भाग चीनकडे सुपूर्द केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही पंतप्रधानांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. मोदींनी लडाखच्या योग्य स्थितीबाबत सांगितले असेल तर मग २० जवानांचे सर्वोच्च बलिदान का झाले? मागील काही आठवड्यांपासून चीनबरोबर सैन्य स्तरावर कोणत्या विषयावर बातचीत सुरू आहे, असा सवाल केला आहे. पंतप्रधान म्हणतात की, भारतीय हद्दीत बाहेरून कोणीही आले नाही. त्यांचे हे विधान लष्करप्रमुख, संरक्षणमंत्री व विदेश मंत्र्यांच्या यापूर्वीच्या विधानाला छेद देणारे आहे. त्यांच्या विधानाने आम्ही हतप्रभ झालो आहोत.
आमच्या भूमीत बाहेरून घुसखोरी झालेली नाही तर मग पाच-सहा मे रोजी दोन्ही सेनांचे समोरासमोर येणे काय होते? ५ मे ते ६ जूनपर्यंत स्थानिक भारतीय कमांडर आपल्या चीनच्या समकक्षांशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करीत होते? सहा जून रोजी दोन्ही देशांच्या कोअर कमांडर स्तरीय चर्चेत कोणत्या विषयावर चर्चा झाली, असा सवालही त्यांनी केला.
>राजा बोला रात है, रानी बोली रात है
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावरील व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे की, राजा बोला रात है, रानी बोली रात है, मंत्री बोला रात है, संतरी बोला रात है, यह सुबह सुबह की बात है.

Web Title: India China FaceOff: For the security and integrity of the country, Prime Minister Modi should follow the rule of law - Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.