नवी दिल्ली – लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यामध्ये ताणतणाव वाढला असून चीनचे हजारो सैनिक गलवान भागातील ३ ठिकाणी भारताच्या हद्दीत घुसले आहेत. चीनी सैनिकांनी पैंगोग सरोवराजवळ फिंगर एरियामध्ये बंकरदेखील बनवण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या या इराद्यामागे फक्त भूभाग ताब्यात घेणे हाच उद्देश नसून आणखी एक महत्त्वाचं कारणामुळे चीन असं कृत्य करत आहे असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
लडाखमध्ये युरोनिअम, ग्रेनाइट, सोने अशा बहुमुल्य धातुंचा समावेश आहे. प्राचीन काळात १० हजार उंट आणि घोड्यांमार्फत लडाखमार्गे चीनसोबत व्यापार होत होता. लेहच्या रस्त्यावरुन उंट, घोडे चीनच्या यारकंद, सिनकिआंग आणि तिबेटची राजधानी ल्हासापर्यंत जात होते. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापर होत होता. लडाखच्या गलवान भागात ज्याठिकाणावरुन भारत आणि चीन यांच्यात विवाद सुरु आहे. त्याच्या नजीकच गोगरा पोस्टजवळ गोल्डेन माऊंटेन आहे. दोन्ही देशांच्या तणावपूर्ण संबंधामुळे या भागात आतापर्यंत मोठा सर्व्हे झाला नाही. पण याच भागात सोन्यासह अन्य बहुमुल्य धातू असल्याचं बोललं जात आहे. लडाखच्या अनेक भागात उच्च गुणवत्ता असणारे युरोनिअमचा खजिना आहे. त्याच्यापासून फक्त वीज नव्हे तर अणूबॉम्बही बनवले जाऊ शकतात.
२००७ मध्ये जर्मनीच्या प्रयोगशाळेत डोंगराच्या नमुन्याची चाचणी केली असता त्यात ५.३६ टक्के युरोनिअम सापडलं होतं. हे संपूर्ण देशात अन्य ठिकाणी मिळालेल्या युरोनिअमपेक्षा अधिक होते. लडाख भारतीय आणि एशियाई प्लेटच्या दरम्यान आहे. याचठिकाणी ५०-६० मिलियन वर्षापूर्वी दोन्ही प्लेटांच्या धडकेने हिमालय पर्वताची निर्मिती झाली. त्यातून लडाखच्या पर्वतामध्ये खनिज पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळतात.
या पर्वतांमध्ये युरेनिअमचे साठे सापडले आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, युरेनिअमने भरलेला लडाख खडक इतरत्रांपेक्षा खूपच नवीन आहे. ते १०० ते २५ कोटी वर्ष जुने आहे. असे युरेनिअम समृद्ध खडक आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये भारतात आढळतात, परंतु ते २५०० ते ३००० मिलियन वर्ष जुने आहेत. चीनच्या ताब्यात असणाऱ्या उदमारु गावातून युरोनिअम आढळलेला पर्वताचे नमुने जर्मनीला संशोधनासाठी घेऊन गेले होते.
या खडकापासून ०.३१ – ५.३६ टक्के पर्यंतचे युरेनिअम आणि ०.७६ – १.४३ टक्के पर्यंतचे थोरियम सापडले. हे युरेनिअम कोहिस्तान, लडाख आणि दक्षिण तिबेटपर्यंत विस्तारलेले आहे. यापूर्वी चीनने अरुणाचल प्रदेशमधील अप्पर सुबानसिरी जिल्ह्यापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर सोन्याचे आणि पृथ्वीच्या दुर्मिळ भागाचे उत्खनन केले होते. त्याला हे सोने तिबेटमधील युलामेड गावात सापडले आहे.
अमेरिकेबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी तज्ञांनी अणुबॉम्बची संख्या अनेक पटींनी वाढवून १ हजार करण्याचा सल्ला दिला आहे. चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सचे संपादक हू शिजिन यांनी म्हटले आहे की, अमेरिकेशी सामोरे जाण्यासाठी चीनला अण्वस्त्रे वाढवून एक हजार करावी लागतील. एका अंदाजानुसार सध्या चीनकडे जवळपास २६० अणुबॉम्ब आहेत. चीनला १००० अणुबॉम्ब बनवल्यास मोठ्या प्रमाणात युरेनिअमची आवश्यकता भासणार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सुमारे ३ कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती धोक्यात; पत्ता, ईमेल, फोन नंबर लीक
कोरोना लसीच्या चाचणीत भारताला मोठी आशा; लहान मुलं अन् वृद्धांवर होणार प्रयोग!
भारताविरुद्ध चीन आणि पाकिस्तानचं मोठं षडयंत्र?; कारगिल युद्धावेळीही ‘असचं’ घडलं होतं!
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखाची मदत; ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय!
कोरोना संक्रमित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं कार्य करतो ‘हा’ विष्णू!