S Jaishankar reply to China:भारताचा शेजारील देश चीन सतत ईशान्येकडील अरुणालच प्रदेशावर आपला दावा सांगतो. यावरुन अनेकदा भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमकी झाल्या आहेत. दरम्यान, आता केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनला कडक शब्दात सुनावले. सोमवारी (1 एप्रिल) मीडियाशी बोलताना जयशंकर म्हणतात, "मी तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होईल का? अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक आहे. नाव बदलून काहीही होणार नाही. भारताचे सैन्य एलएसीवर तैनात आहे. ते त्यांचे काम योग्यरित्या करतील."
दरम्यान, सोमवारीच चीनने भारतातील विविध ठिकाणांच्या 30 नवीन नावांची चौथी यादी जाहीर केली आहे. यानंतर जयशंकर यांची ही प्रतिक्रिया समोर आली. कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी परराष्ट्रमंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारला होता, त्यावर त्यांनी चीनला आरसा दाखवला. अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे भारताने खंडन केले.
चीनने अरुणाचल प्रदेशला 'जंगनान' म्हटले चीनी सरकारी मीडिया 'ग्लोबल टाईम्स' नुसार, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने 'जंगनान'मधील भौगोलिक नावांची चौथी यादी जाहीर केली. चीन अरुणाचल प्रदेशला 'जंगनान' म्हणतो आणि राज्यावर दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करतो. मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रदेशासाठी 30 नावे देखील पोस्ट करण्यात आली आहेत. ही यादी 1 मे पासून लागू होणार आहे. तिथल्या मंत्रालयाने यापूर्वी 2017 मध्ये "जंगनान" मधील सहा ठिकाणांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली, तर 2021 मध्ये 15 ठिकाणांची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर 2023 मध्येही 11 ठिकाणांच्या नावांसह तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती.
अरुणाचल प्रदेशवर अमेरिकेची प्रतिक्रियाअरुणाचल प्रदेश भारताचा भाग असल्याचे म्हणत अमेरिकेने यापूर्वीच चीनवर टीका केली होती. तसेच, एलएसीवर सीमा वाढविण्याच्या दिशेने उचललेल्या चीनच्या पावलांचा निषेधही केला होत.