नवी दिल्ली: चीनबरोबर लडाखमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल आणि जपानी मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्सेस (जेएमएसडीएफ) यांनी हिंदी महासागरात एक संयुक्त युद्धसराव केला आहे. शनिवारी हा युद्धसराव करण्यात आला असून, जपानचे संरक्षणमंत्री तारो कोनो यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हा युद्धसराव पार पडल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यांनी चीनच्या संरक्षण क्षमतांवरच नव्हे, तर इंडो-पॅसिफिक प्रदेशातील चीनच्या हेतूंवरही चिंता व्यक्त केली होती. गेल्या काही महिन्यांत आशियाच्या काही भागांत बीजिंगच्या आक्रमक पवित्र्यानंतर जपानचे हे असे पहिले विधान आहे.भारत-जपान संरक्षण अभ्यासाच्या अनुषंगाने असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स (आसियान) यांनी दक्षिण चीन समुद्राच्या मालकी हक्काचा वाद आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने सोडविला जावा, असे विधान केले होते. दिल्ली आणि टोकियोनं संरक्षण भागीदारी वाढविण्याच्या प्रयत्नांनंतर मागील तीन वर्षांत जेएमएसडीएफ आणि भारतीय नौदलाच्या दरम्यानचा हा 15वा प्रशिक्षण अभ्यास होता.या युद्धात चार युद्धनौका सहभागी झाल्या होत्या. ज्यामध्ये दोन युद्धनौका भारताच्या होत्या आणि दोन जपानच्या युद्धनौका होत्या. आयएनएस राणा आणि आयएनएस कुलुश यांच्यासह जपानी नौदलाचे जेएस काशिमा आणि जेएस शिमायुकी या युद्धसरावात सहभागी झाले होते. सन 2000पासून जेएमएसडीएफ हे जगातील चौथं मोठं नौदल आहे. जपानच्या पाण्यातील क्षेत्रात चीन दावा करत असल्यानं गेल्या काही वर्षांत जपान निरंतर आपला युद्धनौकांचा ताफा वाढवत आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धात चीनही जपानच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा चीनच्या बऱ्यापैकी भागावर जपाननं कब्जा मिळवला होता.
हेही वाचा
मोठी बातमी! आजपासून मिळणार रेल्वेची Tatkal Ticket बुकिंग सेवा; असं करा तिकीट बुक
India China Faceoff: ...म्हणून भारत चीनसोबत आरपारच्या लढाईच्या पर्यायासाठी तयार
पेट्रोल अन् डिझेलचे भाव पुन्हा भडकले, जाणून घ्या आजचे दर
CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी
जवानांसोबतच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा, जून महिन्यातच ३८ अतिरेक्यांना केलं ठार
आजचे राशीभविष्य - 29 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज जीवनसाथी मिळणार