लडाख: भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर येत आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग तलाव परिसरात चिनी सैनिकांनी २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये काही गोष्टींबद्दल सहमती झाली होती. त्यांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्यानं दिली आहे.
पँगाँग तलावाच्या दक्षिणी किनाऱ्यावरून चिनी सैन्यानं घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याला भारतानं विरोध केला. चिनी सैन्याला भारतीय सैन्यानं रोखलं. त्यानंतर भारतानं या भागातील फौजफाटा वाढवला. पँगाँग तलाव परिसरात दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाल्यानंतर चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे.
१९६२ मध्ये चीनने भारतावर पूर्व आणि उत्तर भागातून आक्रमण केले होते. त्यात लडाखमधील भागावर हल्ला करण्याचे कारण म्हणजे चीनने शिन्जियांग प्रांत आणि तिबेटदरम्यान, एक रस्ता बांधला. जी२१९ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याचा सुमारे १७९ किमी भाग चीनने भारतापासून बळकावलेल्या अक्साई चीनमधून जातो. दरम्यान, हा रस्ता बांधल्यानंतर चीनने या भागावर दावा केला. तसेच १९६२ च्या युद्धात आक्रमण करून केलेल्या दाव्यापेक्षा अधिक भागावर कब्जा केला.
चीन या शिन्जियांग-तिबेट महामार्गापासून भारताला दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे या देशाने या क्षेत्रातील सर्व प्रमुख दऱ्या आणि क्रेस्टलाइन्सवर आपला कब्जा दिसेल असा दावा केला. आहे. युद्धकाळात उंचावर असेल्यांना युद्धक्षेत्रात आघाडी असते. त्यामुळे भारताला उंचावरील क्षेत्रात हुकूमत प्रस्तापित करता येऊ नये असा चीनचा प्रयत्न आहे.
दरम्यान, गलवान खोऱ्यातील गलवान नदीच्या बाबतीत रिजलाईन नदीजवळून जाते. त्यामुळे श्योर रूटवरील दऱ्यांमध्ये चीनला आघाडी घेण्याची संधी मिळते. जर चीनने गलवान खोऱ्यातील संपूर्ण भागाला नियंत्रित केले नसते तर अक्साई चीनच्या पठारावर भारताला पोहोचता आले अशते. त्यामुळे चीनला धोका निर्माण झाला असता.
दरम्यान, लडाखमधील उत्तर पूर्व भागात असलेला दौलत बेग ओल्डी हा भाग भारताच्या नियंत्रणात आहे. अक्साई चीन पठारावरील भारताच्या उपस्थितीचे प्रतिनिधित्व हा भाग करतो. या भागाला जोडणारा चांगला रस्ता नसल्याने येथे विमान किंवा हेलिकॉप्टरच्या मदतीने नियंत्रणात ठेवले जात आहे. मात्र या भागात रस्त्याची बांधणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र हा रस्ता श्योक नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असल्याने हिमनग वितळल्यानंतर या रस्त्याचे नुकसान होते. श्योक नदीच्या किनाऱ्यावरून दौलत बेग ओल्डीकडे जाणारा मार्ग हा मार्ग भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.समुद्रात चीनची दादागिरी रोखणार?, नव्या 6 पाणबुड्या खरेदीची भारताची तयारीगलवान व्हॅलीचा बदला! भारताने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका धाडल्या; पाणबुड्याही तयारीतचीन डोकलाम अन् नाथू लामध्ये तयार करतोय मिसाइल साइट्स, सॅटेलाइट फोटोंतून उघड