नवी दिल्ली :लडाखमध्येभारत-चीन तणाव पुन्हा वाढला आहे. भारतीय जवान चिनी सैन्याला जशास तसे उत्तर देत आहेत. यातच चिनी सैनिकांनी 29-30 ऑगस्टच्या रात्री पुन्हा एकदा पेंगाँग भागात केलेला घुसखोरीचा प्रयत्नदेखील भारतीय जवानांनी हाणून पाडला आणि त्यांना हुसकावून लावले. यातच आता सीमेवरील चीनच्या दादागीरीला हँडल करण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजीत डोवाल यांनी मोर्चा सांभाळला आहे.
डोवाल यांनी मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून भारत-चीन सीमेवरील ताज्या स्थितीचा आढावा घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, डोवाल यांनी बोलावलेल्या या बैठकीला सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुप्तचर संस्थांचे प्रमुखही उपस्थित होते. यावेळी चीन आगामी काळात काय पावले उचलू शकतो यावर चर्चा झाली. या बैठकीत केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला हेदेखील उपस्थित होते, असे समजते.
500 चिनी सैनिकांनी केला होता तळ ठोकण्याचा प्रयत्न -चिनी सैनिकांनी 29-30 ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पेंगाँग भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरतीय जवानांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. मिळालेल्या माहितीनुसार, 500 चिनी सैनिकांनी खुसखोरी करत, आहे ती स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेवरनंतर चिनी परराष्ट्र मंत्रालयानेही भाष्य केले होते. भारताने केलेला चिनी सैनिकांच्या घुसखोरीचा दावा चिनी परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लवला आहे. सीमेवर असलेल्या चिनी सैनिकांनी LAC ओलांडलीच नाही, दोन्ही देशांत यासंदर्भात बोलणी सुरू आहे, असे चीनने म्हटले होते.
यापूर्वीही, लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. यासंदर्भात त्यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. यानंतर दोन्ही बाजूंचे सैनिक मागे घेण्यासही सुरुवात झाल्याचे वृत्त होते.
महत्त्वाच्या बातम्या -
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप
चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया
लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती
प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पंचत्वात विलीन