नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्येचीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय एजन्सिज अत्यंत सतर्क आहेत. भारतीय एजन्सिज अरुणाचल प्रदेशच्या उत्तरेकडे लडाखच्या दुसऱ्या बाजूला एलएसीवर पिपल्स लिबरेशन आर्मीच्या हवाई दलाच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिनजियांग आणि तिबेट भागात PLAAF च्या होटन, गर गुनसा, काशघर, होपिंग, डोंका डोंग, लिन्झी आणि पंगट एअरबेसवर पूर्णपणे लक्ष ठेवले जात आहे.
चिनी एअर फोर्सने आपले अनेक एअरबेस अपग्रेड केले आहेत -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी एअर फोर्सने आपले अनेक एअरबेस अपग्रेड केले आहेत. चिनी हवाई दलाने हार्डेन शेल्टर्सची निर्मिती आणि रनवेची लांबी वाढवली आहे. एवढेच नाही, तर त्यांनी अतिरिक्त सैनिकही तैनात केले आहेत. भारताच्या इशान्येकडील राज्यांच्या जवळच दुसऱ्या बाजूला चीनचे लिनझी एअरबेस आहे. हे प्रामुख्याने एक हेलिकॉप्टर बेस आहे. चीनने लागून असलेल्या भारतीय भागांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आपली हालचाल वाढवण्यासाठी तेथे हेलिपॅडचे नेटवर्कदेखील तयार केले आहे.
चीनने भारताला लागून असलेल्या भागांत तैनात केली आहेत लढाऊ विमानं -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगासमोर चर्चा आणि शांतीचा देखावा करणाऱ्या चीनने लडाखच्या भागांत तसेच भारताला लागून असलेल्या इतर भागांत लढाऊ विमानं तैनात केली आहेत. यात सुखोई-30ची चिनी अवृत्ती आणि स्वदेशी जे-सीरीजच्या बॉम्बर्सचा समावेश आहे. भारतीय एजन्सिज, उपग्रह आणि इतर माध्यमांच्या सहाय्याने या सर्व लढाऊ विमानांवर लक्ष ठेऊन आहेत. भारतीय हवाई दलानेही चिनी सैन्याच्या या हालचाली पाहता, आपली तयारीही पूर्ण केली आहे.
चीनच्या कुठल्याही कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दल तयार -भारतीय हवाई दलाने चीनच्या कुठल्याही कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या एअरबेसवर सुखोई-30, सुखोई-30 एमकेआय, मिग-29 आणि मिराज-2000, आधीपासूनच तैनात करून ठेवले आहेत. हवाईदल प्रमूख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी एका फ्रंटलाईन एअरबेसवर मिग-21 बायसन जेट विमानाने उड्डाण केले होते. तसेच तयारीची पाहणीही केली होती.
महत्त्वाच्या बातम्या -
15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया
'हे' गाणं ऐकल्यानंतर अनेकांनी केल्या होत्या आत्महत्या, तब्बल 62 वर्षे घालण्यात आली होती बंदी!
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!
CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!
CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर