- शीलेश शर्मा नवी दिल्ली : भारत-चीनमधील वाद गंभीर रूप घेत असून दोन देशांची वाटचाल युद्धाकडे होत असल्याचे दिसत आहे. भारताने शांततेचे अनेक प्रयत्न करूनही दोन्ही देशाात युद्धाची सुरुवात व्हावी, अशी परिस्थिती चीन करीत आहे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. लडाखच्या पेंगाँग भागात चीनच्या ४ ते ५ सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी त्यांना रोखले होते. त्यानंतर तणाव वाढला आणि तो युद्धात परावर्तीत होऊ शकतो, अशी भीती अमेरिकन काँग्रेसच्या अहवालात आहे.पंतप्रधान मोदी ब्रिक्स संमेलनासाठी जात असून जपानचे पंतप्रधान शिंजो आबे १३ सप्टेंबर रोजी भारतात येत आहेत. पण, ठोस निर्णयाची सध्या अपेक्षा नाही. अमेरिका, आॅस्ट्रेलिया व जपानने भारताला नैतिक पाठिंबा दिला असला तरी जगातील अन्य कोणत्या देशाचे भारताला समर्थन मिळालेले नाही. भारतासोेबत खांद्याला खांदा लावून चीनविरुद्ध उभे राहण्याची भूमिका कोणीही घेतलेली नाही.भारत युद्धाच्या तोंडावर उभा असताना संरक्षण मंत्रालयाने शस्त्रास्त्रे खरेदी करण्याचा आदेश रोखला आहे
भारत-चीनची युद्धाकडे वाटचाल? अमेरिकी काँग्रेसचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:38 AM