नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात एलएसी सीमेववर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, "आपल्या जवानांचे शौर्य आणि त्याग हा देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या कठीण काळात देश त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. आम्हाला भारताच्या जवानांचा पराक्रम आणि त्यांच्या धैर्याचा अभिमान वाटतो."
याचबरोबर, गलवान खोऱ्यात भारतीय जवानांना आलेले वीरमरण अत्यंत वेदनादायी आणि अस्वस्थ करणारे आहे. सीमेवर तैनात असताना आपल्या जवानांनी शौर्य आणि साहस दाखवत देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, असेही राजनाथ सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शहीद जवानांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी, भारत हा शांतीपूर्ण देश आहे. आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताने कधीच कोणावर आक्रमण केलेले नाही. आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम आहोत. शहीद झालेल्या जवानांनाही गर्व असेल की, त्यांना संघर्षात वीरमरण आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, भारत आणि चीनमध्ये सोमवारी दुपारपासून सुरु झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे.
आणखी बातम्या...
दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव
ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास केल्यास शिक्षा होणार नाही? रेल्वे अनेक तरतुदी हटविण्याच्या तयारीत
21 जूनला होणार जगाचा अंत? जाणून घ्या, माया कॅलेंडरच्या दाव्यामागील सत्य...
चिनी सैन्याला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे - कॅप्टन अमरिंदर सिंग
मानसिक रुग्णांना विमा का मिळत नाही?, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल
पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?