शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

भारताने जग जिंकले; नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने पारित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 7:05 AM

जी-२०मध्ये भारताच्या नेतृत्वावर जागतिक नेत्यांचे शिक्कामोर्तब, नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने पारित

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेत सुरू असलेल्या जी-२० परिषदेत नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने पारित करण्यात आला. हे घोषणापत्र पारित होणे हे देशासाठी मोठा विजय असून भारताच्या नेतृत्वावर जागतिक नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे म्हटले जात आहे. जाहीरनाम्यात भारताचा नऊ वेळा उल्लेख करण्यात आला. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आव्हानांना सामोरे जाण्याच्या उद्देशाने भारताच्या अध्यक्षतेखालील जी-२० शिखर परिषदेचे शनिवारी (दि. ९) दिल्लीत मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह जगातील प्रमुख देशांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत परिषदेला सुरुवात झाली. प्रगती मैदानात उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य, तितक्याच देखण्या आणि लक्षवेधक अशा ‘भारत मंडपम्’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राष्ट्रप्रमुखांचे हृद्य स्वागत केले.

जाहीरनाम्यातील प्रमुख प्रस्ताव

सर्व देश शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर काम करतील. भारताच्या पुढाकारात ‘एक भविष्य आघाडी’ स्थापन होईल.जैविक इंधन आघाडीची स्थापना केली जाईल. आघाडीत भारत, अमेरिका आणि ब्राझील संस्थापक सदस्य असतील.एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य यावर जोर दिला जाईल.बहुपक्षीय विकास बँकांना बळ दिले जाईल. त्यांना अधिक कार्यक्षम केले जाईल.क्रिप्टोकरन्सीसंदर्भात जागतिक पातळीवर धोरण निश्चित करण्यासाठी चर्चा केली जाईल. कर्जप्रणालीसाठी आणखी चांगली व्यवस्था निर्माण करणे. वेगाने विकसित होणाऱ्या शहरांना निधी उपलब्ध करणे.हरित आणि अल्प कार्बन ऊर्जा तंत्रज्ञानासाठी काम केले जाईल.दहशतवादाचा सर्व देशांकडून विरोध केला जाईल. अण्वस्त्रांचा वापर किंवा हल्ल्याची धमकी देणे अस्वीकारार्ह असेल. एखाद्या देशाच्या भूभागावर ताबा घेण्याचा किंवा त्याबाबत धमकी देण्यास विरोध करणे. तसेच सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर राखणे.मानवी दुःख, जागतिक अन्न आणि ऊर्जा सुरक्षिततेसाठी युक्रेनमधील युद्धाच्या नकारात्मक प्रभावांवर प्रकाश टाकणे. युक्रेनमध्ये व्यापक, न्यायसंगत आणि दीर्घकालीन शांतता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे. कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित धोके लक्षात घेता, त्याचा सकारात्मक वापर करण्यावर भर देणे. निर्णयप्रक्रियेत महिलांना पूर्ण, समान.

 

 

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदIndiaभारतNarendra Modi Stadiumनरेंद्र मोदी स्टेडियम