नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज देशात पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोनारुग्ण समोर आले. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 2,17,353 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 1185 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दिलासादायक गोष्ट म्हणजे, 1,18,302 जण कोरोनावर मात करून ठणठणीत बरेही झाले आहेत. यापूर्वी बुधवारी देशात 2,00,739 नवे कोरोना रुग्ण समोर आले होते. तर गेल्या 30 सप्टेंबरला देशात अकराशे हून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. (India coronavirus cases death discharged status update 16 april 2021)
देशात आजची स्थिती -
- एकूण कोरोनाबाधित - एक कोटी 42 लाख 91 हजार 917
- एकूण डिस्चार्ज- एक कोटी 25 लाख 47 हजार 866
- एकूण अॅक्टिव्ह रुग्ण - 15 लाख 69 हजार 743
- एकूण मृत्यू - 1 लाख 74 हजार 308
- एकूण लसीकरण - 11 कोटी 72 लाख 23 हजार 509 डोस देण्यात आले आहेत.
CoronaVirus : आता कोरोनाविरोधातील लढाईत महाराष्ट्राला मुकेश अंबानींचा मदतीचा हात, मोफत पुरवतायत ऑक्सीजनमहाराष्ट्राची स्थिती सर्वात वाईट -महाराष्ट्रात संचारबंदीचे नियम लागू झाल्यानंतरही कोरोनाचा कहर कायम असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी 61 हजार 695 रुग्ण आणि 349 मृत्यूंची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 36 लाख 39 हजार 855 झाली असून बळींचा आकडा 59 हजार 153 इतका आहे. सध्या राज्यात 6 लाख 20 हजार 60 रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात मागील 24 तासांत 53 हजार 335 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 29 लाख 59 हजार 56 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.3 टक्के आहे. यापूर्वी, 11 एप्रिलला एकाच दिवसात 63,294 रुग्ण समोर आले होते.
CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!
गुरुवारी 27 लाख कोरोना लशी देण्यात आल्या - देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. 15 एप्रिलपर्यंत देशभरात 11 कोटी 72 लाख 23 हजार 509 कोरोना डोस देण्यात आले आहेत. काल 27 लाख 30 हजार 359 डोस देण्यात आले. लशीचा दुसरा डोस देण्याच्या अभियानाला 13 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात येत आहे.
CoronaVirus : बेजबाबदारपणाचा कळस! आधी दिली Covaxin, तर दुसऱ्यांदा दिला Covishieldचा डोस; मग...
देशातील कोरोना मृत्यूदर 1.23 टक्के - देशातील कोरोना मृत्यूदर 1.23 टक्के एवढा आहे. तर रिकव्हरी रेट जवळपास 88 टक्के एवढा आहे. अॅक्टिव्ह केसमध्ये वाढ होऊन ते 10 टक्क्यांच्याही वर पोहचले आहेत. कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत आता भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो, तर एकूण संक्रमित रुग्ण संख्येच्या बाततीत दुसरा क्रमांक लागतो."आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"