नवी दिल्ली - भारतात पुन्हा एकदा एकाच दिवसात 40 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. काल, देशात 30,941 नवे कोरोना रुग्ण समोर आले होते. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 41,965 नवे कोरोना रुग्ण समोर आले, तर 460 कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला. त्याच वेळी, 33,964 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच देशात 7541 सक्रिय रुग्णांत वाढ झाली आहे. (India coronavirus update today new coronavirus cases deaths and recovery)
यापूर्वी, सलग पाच दिवस देशात 40 हजारहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. बुधवारी 46,164, गुरुवारी 44,658, शुक्रवारी 46,759, शनिवारी 45,083 आणि सोमवारी 42,909 होते. भारतातील कोरोना संसर्ग वाढण्याचे मुख्य कारण केरळ असल्याचे मानले जात आहे. केरळमध्ये काल तब्बल 30,203 नवे रुग्ण समोर आले होते. याच बरोबर येथील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून 40 लाख 57 हजार 233 वर पोहोचली आहे. तर 115 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांचा आकडा वाढून आता 20,788 वर पोहोचला आहे.
चिंता वाढली! कोरोनाची तिसरी लाट 'या' महिन्यांत राहणार शिगेला; वैज्ञानिकांनी दिला मोठा इशाराअशी आहे भारतातील कोरोना स्थिती -देशभरात आतापर्यंत एकूण तीन कोटी 28 लाख 10 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यांपैकी 4 लाख 39 हजार 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 19 लाख 93 हजार लोकांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत झाले आहेत. या घडीला देशभरात तब्बल 3 लाख 78 हजार लोक कोरोना सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एकूण कोरोना रुग्ण - 3 कोटी 28 लाख 10 हजार 845एकूण डिस्चार्ज - तीन कोटी 19 लाख 93 हजार 644एकूण सक्रिय प्रकरणे - तीन लाख 78 हजार 181एकूण मृत्यू - चार लाख 39 हजार 20एकूण लसीकरण - 65 कोटी 41 लाख 13 हजार डोस देण्यात आले