CoronaVirus : देशात 24 तासांत समोर आले 38,353 नवे कोरोना बाधित, 'या' राज्यात आढळले सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 12:08 PM2021-08-11T12:08:10+5:302021-08-11T12:09:05+5:30

Coronavirus Updates : कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत देशात एकूण तीन कोटी 20 लाख 36 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. तर यांपैकी 4 लाख 29 हजार 179 लोकांचा मृत्यू झाला आहे.

India Coronavirus Updates active case load currently lowest in 140 days | CoronaVirus : देशात 24 तासांत समोर आले 38,353 नवे कोरोना बाधित, 'या' राज्यात आढळले सर्वाधिक रुग्ण

CoronaVirus : देशात 24 तासांत समोर आले 38,353 नवे कोरोना बाधित, 'या' राज्यात आढळले सर्वाधिक रुग्ण

googlenewsNext

नवी दिल्ली - एका दिवसाचा दिलासा मिळाल्यानंतर कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 38,353 नवे कोरोना रुग्ण समोर आले. तर 497 संक्रमितांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर, देशभरात गेल्या 24 तासांत 40013 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच सक्रिय रुग्ण संख्या 2,157 ने कमी झाली आहे. सध्या, देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 3,86,351 एवढी आहे. ही संख्या गेल्या 140 दिवसांनंतरची सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. तर रिकव्हरी रेट 97.45%पर्यंत पोहोचला आहे. (India Coronavirus Updates active case load currently lowest in 140 days)

एकूण कोरोना संक्रमित -
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत देशात एकूण तीन कोटी 20 लाख 36 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. तर यांपैकी 4 लाख 29 हजार 179 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 12 लाख 20 हजार लोक बरेही झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या आता चार लाखांपेक्षा कमी झाली आहे.

Corona Vaccine : DGCIचा मोठा निर्णय...! कोव्हॅक्सीन-कोविशील्डच्या मिक्स डोससंदर्भात अभ्यासाची दिली परवानगी

ऐकूण रुग्ण - तीन कोटी 20 लाख 36 हजार, 511.
एकूण डिस्चार्ज - तीन कोटी 12 लाख 20 हजार 981.
एकूण अॅक्टिव्ह केसेस - तीन लाख 86 हजार 351.
एकूण मौत - चार लाख 29 हजार 179.
एकूण लसीकरण - 51 कोटी 90 लाख डोस देण्यात आले.

केरळमध्ये सर्वाधिक नवे रुग्ण -
केरळमध्ये मंगळवारी 21,119 नवे कोरोना रुग्ण समोर आले. आता राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा 35,86,693 वर पोहोचला आहे. राज्यातील संक्रमणदर 16 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. येथे गेल्या एक दिवसात कोरोनामुळे 152 लोकांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृतांची संख्या आता 18004 एवढी झाली आहे. सोमवारपासून आतापर्यंत 18493 रुग्ण संक्रमणमुक्त झाले आहेत. याच बरोबर राज्यातील कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या आता 33,96,184 झाली आहे.

 

Web Title: India Coronavirus Updates active case load currently lowest in 140 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.