शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

CoronaVirus : देशात 24 तासांत समोर आले 38,353 नवे कोरोना बाधित, 'या' राज्यात आढळले सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 12:08 PM

Coronavirus Updates : कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत देशात एकूण तीन कोटी 20 लाख 36 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. तर यांपैकी 4 लाख 29 हजार 179 लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - एका दिवसाचा दिलासा मिळाल्यानंतर कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 38,353 नवे कोरोना रुग्ण समोर आले. तर 497 संक्रमितांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर, देशभरात गेल्या 24 तासांत 40013 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच सक्रिय रुग्ण संख्या 2,157 ने कमी झाली आहे. सध्या, देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 3,86,351 एवढी आहे. ही संख्या गेल्या 140 दिवसांनंतरची सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. तर रिकव्हरी रेट 97.45%पर्यंत पोहोचला आहे. (India Coronavirus Updates active case load currently lowest in 140 days)

एकूण कोरोना संक्रमित -कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत देशात एकूण तीन कोटी 20 लाख 36 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. तर यांपैकी 4 लाख 29 हजार 179 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 12 लाख 20 हजार लोक बरेही झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या आता चार लाखांपेक्षा कमी झाली आहे.

Corona Vaccine : DGCIचा मोठा निर्णय...! कोव्हॅक्सीन-कोविशील्डच्या मिक्स डोससंदर्भात अभ्यासाची दिली परवानगी

ऐकूण रुग्ण - तीन कोटी 20 लाख 36 हजार, 511.एकूण डिस्चार्ज - तीन कोटी 12 लाख 20 हजार 981.एकूण अॅक्टिव्ह केसेस - तीन लाख 86 हजार 351.एकूण मौत - चार लाख 29 हजार 179.एकूण लसीकरण - 51 कोटी 90 लाख डोस देण्यात आले.

केरळमध्ये सर्वाधिक नवे रुग्ण -केरळमध्ये मंगळवारी 21,119 नवे कोरोना रुग्ण समोर आले. आता राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा 35,86,693 वर पोहोचला आहे. राज्यातील संक्रमणदर 16 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. येथे गेल्या एक दिवसात कोरोनामुळे 152 लोकांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृतांची संख्या आता 18004 एवढी झाली आहे. सोमवारपासून आतापर्यंत 18493 रुग्ण संक्रमणमुक्त झाले आहेत. याच बरोबर राज्यातील कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या आता 33,96,184 झाली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळIndiaभारत