बीजिंग : दहशतवाद्यांना पोसणाºया व त्यांना आर्थिक रसद पुरविणाºया देशांना पायबंद घातला पाहिजे. त्या देशांच्या कारवायांचा खंबीरपणे मुकाबला करायला हवा अशा शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर टीका केली. शांघाय को-आॅपरेशन आॅर्गनायझेशनने (एससीओ) आयोजिलेल्या विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मुहम्मद असीफ हेही उपस्थित होते. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन याही चीनमध्ये असून, त्यांनी चीन व भारतातील मतभेदांचे रूपांतर वादामध्ये होऊ नये असे मत व्यक्त केले. चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंघ यांची त्यांनी भेट घेतली. डोकलामच्या संदर्भात सीतारामन यांचे मत महत्त्वाचे आहे. (वृत्तसंस्था)
मोदी-शी भेट महत्त्वाचीपंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात २७ एप्रिलपासून होणारी दोन दिवसीय बैठक ही भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी व चीनचे नेते डेंग शीआओपिंग यांच्यात १९८८साली झालेल्या बैठकीइतकीच महत्त्वाची ठरेल, असे चिनी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. डोकलाम प्रश्नावरून भारत व चीनमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे त्यावर नेमका काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, राजीव गांधी व डेंग शीआओपिंग यांच्या बैठकीनंतर दोन्ही देशांच्या संबंधांना नवे वळण मिळाले होते. तसेच चित्र यावेळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.