नवी दिल्ली: पाकिस्तानभारतीय सीमेपासून कर्तारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत तर भारत गुरदासपूरमधील डेरा बाबा नानकपासून सीमेपर्यंत कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. या कॉरिडॉरच्या उद्घाटनाप्रसंगी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देखील कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या सर्व पक्षीय शिष्टमंडळात सहभागी होणार असल्याने मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानकडे झेड प्लस श्रेणीची सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या 9 नोव्हेंबरमध्ये हा कॉरिडॉर सुरू होणार आहे. भारताकडून 550 जणांचे शिष्टमंडळ या कॉरिडॉरला भेट देणार आहे. यामध्ये मनमोहन सिंग यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा देखील समावेश आहे. तसेच गुप्तचर यंत्रणेनेकडून कर्तापूरमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने भारताने पाकिस्तानकडे कडक सुरक्षाव्यवस्था देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानने मनमोहन सिंग यांच्यासाठी बॅटरीवर चालणारी व चारही बाजूने ओपन असणारी कारची व्यवस्था करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
पाकिस्तान भारतीय सीमेपासून कर्तारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत तर भारत गुरदासपूरमधील डेरा बाबा नानकपासून सीमेपर्यंत कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबरमध्ये हा कॉरिडॉर सुरू होणार आहे. या कॉरिडॉर मार्गे पाकिस्तानातील दरबार साहिब येथे दररोज ५ हजार शीख भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.