चीनची लडाखमधली अरेरावी पाहता भारतानं फ्रान्समधून आणलेली प्रगत युद्ध विमान राफेल चीनला लागून असलेल्या सीमाभागात तैनात केली आहेत. हे लक्षात घेता चीनने सीमेवर लढाऊ विमानंही तैनात केली आहेत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने भारतीय आणि चिनी सैन्यांदरम्यान पुन्हा कारवाईची शक्यता लक्षात घेता लडाख प्रदेशात लढाऊ विमानं तैनात केली होती. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वायुसेनेने (पीएलए) पाचव्या पिढीचे लढाऊ विमान जे -20 लडाखच्या पेंगाँग तलावाच्या दक्षिणेकडच्या काठावर तैनात केले आहे.अजूनही या भागात विमाने मोठ्या प्रमाणात उड्डाण करत आहेत. सरकारी सूत्रांनी सांगितले की, जे-20 लढाऊ विमानं चीनच्या हवाई दलाने हॉटन एअर बेसवर तैनात केली आहेत. ती लडाख आणि लगतच्या भारतीय प्रदेशाच्या जवळ उड्डाण करणार आहेत. अद्यापही चिनी सैन्यामार्फत मोक्याचा ठिकाणी बॉम्बर विमानं तैनात केली जात आहेत. चीनच्या हवाई दलाने लडाखजवळील हवाई तळांवर आपले अत्याधुनिक व सर्वात सक्षम विमान पुन्हा कार्यान्वित करण्याची ही कारवाई भारतानं गांभीर्यानं घेतली आहे.भारतानं लढाऊ विमानं मोठ्या संख्येनं चीनला लागून असलेल्या सीमेवर तैनात केली आहेत. पाच राफेल विमान भारतीय हवाई दलात सामील झाली आहेत, तर पुढील काही महिन्यांत आणखी तीन ते चार राफेल विमानं हवाई दलात दाखल होतील.आधी ही विमानं चीनच्या दुसऱ्या तळावर तैनात होतीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीननं जे -20 आणि इतर विमानं मोठ्या प्रमाणावर तैनात केली आहेत, मुख्यत्वे लडाख प्रदेशातील वेगवेगळ्या विमानतळांवरून ती उड्डाण करत आहेत. या भागात लडाखच्या पलीकडची बाजू आणि इतर भागांचा समावेश आहे. यापूर्वी चीनने या भागात जे -20 विमान तैनात केली होते. नंतर त्यांना दुसर्या चिनी तळावर तैनात करण्यात आले होते.
India China Faceoff : लडाखमध्ये राफेलच्या उपस्थितीनं चीन घाबरला, तैनात केली जे-20 विमानं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 10:45 AM