Indira Gandhi Death Anniversary : नरेंद्र मोदी, राहुल गांधी अन् सोनिया गांधींनी इंदिराजींना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 09:03 AM2018-10-31T09:03:31+5:302018-10-31T09:22:03+5:30

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 34 वी पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. 

india former prime minister indira gandhi death anniversary the country is paying tribute | Indira Gandhi Death Anniversary : नरेंद्र मोदी, राहुल गांधी अन् सोनिया गांधींनी इंदिराजींना वाहिली श्रद्धांजली

Indira Gandhi Death Anniversary : नरेंद्र मोदी, राहुल गांधी अन् सोनिया गांधींनी इंदिराजींना वाहिली श्रद्धांजली

googlenewsNext

नवी दिल्ली - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 34 वी पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह अनेक मान्यवरांनी इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली होती.


Indira Gandhi Death Anniversary : ...म्हणून इंदिरा गांधींना म्हणतात भारताची 'आयर्न लेडी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. इंदिरा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन राहुल गांधी, सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आदरांजली वाहिली. इंदिरा गांधींच्या 34 व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या वतीने देशभरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. 


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीटरवर इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'आजीने मला खूप काही शिकवलं आणि माझ्यावर अतिशय प्रेम केलं. तिने जनतेसाठी खूप काही केलं. मला तिचा अभिमान आहे' अशा शब्दात राहुल गांधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 



इंदिरा गांधी या भारताच्या एक सशक्त महिला पंतप्रधान राहिल्या आहेत. ज्यांच्या अढळ निर्णयांनी जगाला भारतापुढे झुकायला भाग पाडलं होतं. त्यांच्या कणखर भूमिका अन् कठोर निर्णयक्षमतेमुळेच बांगलादेश हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला. भारतानं त्यांच्या कार्यकाळात अवकाश क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. पंजाबमध्ये उफाळून आलेला हिंसाचार थोपवण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच त्यांच्या कार्यकाळात भारत आण्विक संपन्न देश झाला. त्यांच्या कठोर निर्णय घेण्याच्या भूमिकेला विरोधकांनी नेहमीच विरोध केला. परंतु त्या कोणालाही न जुमानता देशाहिताचे निर्णय घेत राहिल्या. त्यामुळेच त्यांना आयर्न लेडी म्हटलं जातं.
 

 


 

Web Title: india former prime minister indira gandhi death anniversary the country is paying tribute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.