न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत दहशतवादावरूनभारतानंपाकिस्तानची खरडपट्टी काढली आहे. दहशतवाद हा जगासाठी धोकादायक आहे. जगातील सुरक्षेवर त्याचे मोठे आव्हान आहे. क्रॉस बॉर्डर नेटवर्कही त्यापैकी एक आहे. दहशतवाद्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:ची ताकद वाढवली आहे. ते आज अत्याधुनिक हत्यारे वापरत आहेत. एकमेकांच्या साहाय्याने दहशतवादाला हरवलं जाऊ शकते असं सांगत भारतानेपाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणाऱ्या खतपाणीवर कठोर भाष्य केले आहे.
भारताने पुढे म्हटलं की, दहशतवादाशी कसं लढायचं यावर जगात अद्याप एकमत होऊ शकत नाही. दहशतवादावर ९/११ च्या हल्ल्यानंतर जगाला जाग आली. नोव्हेंबर १९९६ साली भारताने पहिल्यांदा जागतिक दहशतवादावर एक व्यापक चर्चेसाठी पुढाकार घेतला होता. जवळपास याला ३० वर्ष झाली तरीही सहमती बनली नाही. जेव्हा जगाने दहशतवादाला गांभीर्याने घेतले नाही तेव्हापासून भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करत आहे. मागील ३ दशकात भारतात हजारो लोक मारले गेलेत. २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाला, २०१६ साली पठाणकोट एअरबेसजवळ स्फोट, २०१९ मध्ये पुलवामात आत्मघातकी हल्ला हे त्यातील एक आहे. भारत झीरो टॉलरेंस दाखवून दहशतावादाशी लढेल असं सांगण्यात आले.
तसेच आपल्यातील काही देश राजकीय अजेंडा डोळ्यासमोर ठेवून दहशतवादाला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात हा दुर्दैवी प्रकार आहे. अशा देशांमुळे दहशतवादाशी लढण्याच्या संकल्पाला धक्का पोहचतो. याच देशांमुळे १५ वर्षानंतरही २६/११ मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आजही सरकारी सुविधेत वेगवेगळ्या देशात फिरतो. हे देश केवळ दहशतवादाला प्रोत्सहन देत नाही तर त्यांच्या सरकार आणि एजेन्सीकडून स्वत:साठी स्टेट पॉलिसी बनवतात असंही भारताने पाकिस्तानला नाव न घेता सुनावले आहे.
दरम्यान, आपल्या कुख्यात अजेंड्याकडे जगाचं लक्ष जावू नये यासाठी दिशाभूल करत हे देश स्वत: दहशतवादी पीडित असल्याचं जगाला दाखवून देत राहतात. संयुक्त राष्ट्राकडून प्रतिबंद असलेल्या दहशतवादी संघटना जशा लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद भारताच्या जमिनीवर हल्ले करत राहतात. त्याविरोधात मजबूत कायदेशीर कारवाई करण्याची आजची गरज आहे असंही भारताने संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत म्हटलं आहे.