नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत देशातील ९६.८८ कोटी नागरिक मतदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. आता भारतात जगातील सर्वाधिक मतदार आहेत. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत हे लोक मतदानाचा हक्क बजावू शकतील.निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली.
१.६५ कोटी नावे यादीतून वगळलीमतदारयाद्यांची फेरतपासणी करण्यात आली. अनेक कारणांमुळे १.६५ कोटी नावे मतदारयादीतून वगळली.त्यामध्ये ६७.८२ लाख मृत व्यक्ती, दुसरीकडे राहायला गेलेले ७५.११ लाख लोक, २२.०५ डुप्लिकेट मतदार यांचा समावेश आहे.
२.६३ कोटी नव्या मतदारांची नोंदn२.६३ कोटी नवे मतदार मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात १.४१ कोटी महिला आहेत. तर १.२२ कोटी पुरूष आहे.nनव्या महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा १५ टक्क्यांहून अधिक आहे. ८८.३५ लाख दिव्यांगांचा समावेश आहे.
१.८५कोटी मतदार ८० वर्षांहून अधिक वयोमानाचे आहेत.१७वर्षांहून अधिक पण १८ वर्षेपूर्ण न झालेल्या१०.६४ लाख लोकांनीकेले मतदार होण्यासाठी अर्ज केले आहेत.२.३८लाख लोक आहेत १०० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत.१५.३०कोटी उत्तर प्रदेशात मतदार. सर्व राज्यांमधील सर्वाधिक मतदार असलेले राज्य आहे.