कोची (केरळ) : विडीमुळे झालेले आजार व अकाली मृत्यूमुळे भारताला २०१७ मध्ये तब्बल ८०५.५ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे एका अभ्यासात पुढे आले आहे.भारतात विडी खूप लोकप्रिय आहे व धूम्रपानामध्ये प्रक्रिया न केलेल्या तंबाखूचा ८१ टक्के वापर होतो. देशात १५ वर्षांहून अधिक वयाचे ७.२ कोटी लोक विडी ओढतात. ‘टोबॅको कंट्रोल’ नियतकालिकात प्रकाशित अभ्यासानुसार, केरळमधील सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी रिसर्च (सीपीपीआर) नुसार, विडीमध्ये सर्वसामान्य सिगारेटपेक्षा कमी तंबाखू असते. निकोटिनचा स्तर जास्त असतो. विडी मंद जळते. त्यामुळे ती पिणाऱ्याच्या शरीरात जास्त प्रमाणात रसायन प्रवेश करते. विडी ओढण्याने अनेक प्रकारचे कर्करोग, क्षयरोग व फुफ्फुसासंबंधी आजार होतात. तरीही त्यावर सिगारेटच्या तुलनेत खूपच कमी कर लागतो. भारतात आजवर विडी ओढल्यामुळे होणाºया आर्थिक नुकसानीचा अभ्यास यापूर्वी कधीही केला गेलेला नाही. आर्थिक नुकसानीसंबंधी केलेल्या पहिल्याच अभ्यासात विडीमुळे होणारे आजार व अकाली मृत्यूमुळे भारताला ८०५.५ अब्ज रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. विडीमुळे होणारे थेट खर्च जसे वैद्यकीय तपासणी, औषधी, डॉक्टरचे शुल्क, रुग्णालय खर्च, प्रवास मिळून १६८.७ अब्जांचे नुकसान झाले, अप्रत्यक्ष खर्च जसे नातेवाईकांकडे राहणे व देखभाल आणि उत्पन्न बंद होणे, हा खर्च ८११.२ अब्ज रुपये आहे. (वृत्तसंस्था)दर चार पुरुषांपैैकी एक करतो धूम्रपानभारतात ३० ते ६९ वयोगटातील प्रत्येक चार पुरुषांपैकी एक जण विडी ओढतो. देशात सुमारे पाच कुटुंबांपैकी एकाला आरोग्याची देखभाल करण्यासाठी खूप खर्च करावा लागतो व त्यामुळे ६.३ कोटींपेक्षा अधिक लोक गरिबीच्या खाईत ढकलले जातात.
विडीमुळे भारताला ८०५ अब्जांचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 6:05 AM