शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

'संकुचित दृष्टीकोन सोडा...', अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर एस जयशंकर यांचे प्रत्तुत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 2:43 PM

भारताने इराणसोबत चाबहार बंदराचा करार केल्यामुळे अमेरिकेला मिरची झोंबली आहे.

India-Iran Chabahar Port Deal : नुकताच भारत आणि इराणमध्ये एक मोठा करार झाला आहे. या करारांतर्गत पुढील 10 वर्षांसाठी इराणमधील चाबहार बंदराची जबाबदारी भारताकडे असेल. भारत, इराणसह अनेक देशांना या कराराचा फायदा होणार आहे. मात्र, काही देशांना मिर्चीही झोंबली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तणाव सुरू आहे. अशातच अमेरिकने या करारावरुन भारताला नाव न घेता इशारा दिला.

अमेरिकेचा इशारा अन् जयशंकर यांचे चोख प्रत्युत्तर चाबहार बंदरावरील करारानंतर अवघ्या काही तासांतच अमेरिकेने भारताचे नाव न घेता म्हटले की, इराणशी द्विपक्षीय करार करणाऱ्या कोणत्याही देशावर आम्ही निर्बंध लादू शकतो. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

मंगळवारी रात्री कोलकाता येथे त्यांच्या 'व्हाय भारत मॅटर्स' या पुस्तकाच्या बंगाली आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी त्यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली. चाबहार बंदराबाबत झालेल्या करारावर लोकांनी आपला संकुचित दृष्टिकोन सोडला पाहिजे. चाबहार बंदराचा संपूर्ण क्षेत्राला फायदा होईल आणि त्याबाबत संकुचित दृष्टिकोन बाळगू नये, असे ते म्हणाले

जयशंकर पुढे म्हणाले, चाबहार बंदराशी आमचा दीर्घकाळापासून संबंध होता, परंतु आम्ही कधीही दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी करू शकलो नाही. त्यावेळी विविध समस्या होत्या, आता त्या सर्व समस्या सोडवल्या आहेत. आता आम्ही दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी करण्यास सक्षम आहोत. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIranइराणIndiaभारतAmericaअमेरिका