शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

Gagandeep Kang : भारत Covid Vaccine खरेदीच्या शर्यतीत मागे राहिला; व्हायरोलॉजिस्ट गगनदीप कांग यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 12:06 PM

Top Virologist Gagandeep Kang : India lags behind in race to buy Covid 19 Vaccine गगनदीप कांग या सर्वोच्च न्यायालयानं वैद्यकीय ऑक्सिजनर स्थापन केलेल्या समितीच्या सदस्याही आहेत. भारतानं लस खरेदीसाठी उशिर केला, कांग यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देभारतानं लस खरेदीसाठी उशिर केला, कांग यांचं वक्तव्य.गगनदीप कांग या सर्वोच्च न्यायालयानं वैद्यकीय ऑक्सिजनर स्थापन केलेल्या समितीच्या सदस्याही आहेत.

सध्या भारतात दुसऱ्या लाटेमुळे Corona Virus हाहाकार माजला आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, लसींच्या खरेदीबाबत टॉप व्हायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग यांनी (Top Virologist Gagandeep Kang) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अमेरिकेनं देशवासीयांना कोरोना प्रतिबंधातम्क लस देण्यासाठी ऑपरेशन वार्प स्पीड (Operation Warp Speed) मार्च २०२० मध्ये सुरु केलं होतं. त्यावेळी कोणतीही लस विकसित झाली नव्हती. परंतु भारतानं लसीच्या (Covid Vaccine) वैद्यकीय चाचणीसाठी कोणत्याही प्रकारचा निधी दिला नव्हता किंवा लसीच्या ऑर्डरसाठी कोणत्याही प्रकारची आगाऊ रक्कम दिली नव्हती," असं कांग म्हणाल्या. भारतानं लस खरेदी करण्याच्या शर्यतीत उशीर केला आहे आणि आता भारताकडे मोजक्या प्रमाणात पर्याय उपलब्ध असल्याचंही त्या म्हणाल्या. Top Virologist Gagandeep Kang : India lags behind in race to buy Covid 19 Vaccine.गगनदीप कांग या सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय ऑक्सिजनसाठी असलेल्या समितीच्या सदस्य आहेत. "संपूर्ण जग गेल्या वर्षभरापासून जोखीम पत्करून लस खरेदीसाठी सरसावलं होतं. परंतु आता बाजारात आपल्यासाठी सप्लाय चेन शिल्लक आहे का आता आपण म्हणतोय आम्हाला लस खरेदी करायची आहे," असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. एनडीटीव्हीशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. डॉ. कांग यांचं हे वक्तव्य अशावेळी समोर आलं आहे जेव्हा अनेक राज्यांनी लसींच्या पुरवठ्यासाठी जागतिक निविदा काढल्या आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश अशा काही राज्यांनी ही पावलं उचलली आहेत.... तर उत्पादन क्षमता वाढवण्यास सांगाकोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी अनेक राज्यांनी ही पावलं उचलली आहेत. अनेक राज्यांमध्ये  लसींच्या योग्य प्रणामात होत नसलेल्या पुरवठ्यामुळे लसीकरण केंद्र बंद झाल्याचंही सांगण्यात येत आहे. "जर तुम्ही झायडस कँडिला, बायोलॉजिकल ई सारख्या कंपन्यांकडे जाऊ शकता ज्यांची लस या वर्षाच्या अखेरीस येणार आहे. तुम्ही त्यांना लसींच्या उत्पादनात वेग आणण्यास आणि उत्पादन क्षमता वाढवण्यास सांगू शकता. जर तुमच्या चाचण्या यशस्वी झाल्या तर आम्ही सर्व लसी खरेदी करू असं सांगता येईल. याप्रकारे आपल्याला अधिक लसी मिळू शकतील, असंही त्या म्हणाल्या.चाचणीप्रक्रियेदरम्यान गुंतवणूककाँग या रॉयल सोसायटीच्या फेलो बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. चाचणी प्रक्रियेदरम्यान लसीबाबत गुंतवणूक करण्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. "मी निश्चितच असं सांगेन की आपल्याला  अशी गुंतवणूक करायला हवी. "आपण  याद्वारे प्रमाण सिद्ध करू, तसंच आपण संशोधन आणि नावीन्यपूर्ण गुंतवणूकीस तयार असल्याचेही सांगू शकतो," असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय