नवी दिल्ली- भारतीय हद्दीत पाकिस्तानने हवाई हल्ला केल्यानंतर त्यास भारताने चोख प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान जमिनीवर पाडले आहे. दरम्यान, या कारवाईत भारताचेही एक मिग 21 विमान गमावल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तसेच भारताचा एक वैमानिक बेपत्ता असल्याचंही ते म्हणाले आहेत. भारतानं काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्ताननंही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारतानं पाकिस्तानचं एक विमान पाडलं. या कारवाईत भारतानंही एक मिग 21 विमान गमावलं आहे. तसेच एक वैमानिक बेपत्ता आहे. पाकिस्तान दावा करत आहेत की तो बेपत्ता जवान त्यांच्या ताब्यात आहे. त्याची सत्यता आम्ही पडताळून पाहत आहोत, असंही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले आहेत.
पाकिस्तानच्या मीडिया आणि सरकारकडून या खोट्या बातम्या पसरविण्यात आल्याने तेथील सोशल मीडियावरही हा व्हिडीओ अन् फोटो व्हायरल झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून भारताचे विमान पाडल्याचा दावा केला जात असला तरी भारतीय सैन्याकडून या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. पाकिस्ताननं एका विंग कमांडरला अटक केल्याचा दावा केला असून, त्याचं नाव अभिनंदन वर्थमान असल्याचं सांगितलं जातंय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत भारताची बाजू मांडली आहे. 'पाकिस्तानची विमाने आपल्या हद्दीत घुसल्यानंतर सतर्क असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानचा हल्ला करण्याचा मनसुबा हाणून पाडला भारताच्या 'मिग 21' विमानाने पाकिस्ताननं पाकिस्तानच्या एका विमानाला जमिनीवर पाडले. ते विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळताना पाहायला मिळाले. परंतु या कारवाईदरम्यान भारतानंही एक 'मिग 21' विमान गमावले. तसेच त्या विमानातील एक वैमानिक अद्यापही बेपत्ता आहे. पाकिस्ताननं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्येही एक व्यक्ती अभिनंदन असल्याचं सांगत आहे. तसेच तो व्यक्ती वायुसेनेचे विंग कमांडर असल्याचीही माहिती देत आहे. त्याचा सर्व्हिस नंबर 27981 असल्याचंही या व्हिडीओतून दिसत आहे. पाकिस्ताननं सांगितलं आहे की, अभिनंदन 16 डिसेंबर 2015मध्ये वायुसेनेत दाखल झाला होता. व्हिडीओमध्ये दिसत असलेला व्यक्ती जखमी असून, त्याला दोरीच्या सहाय्यानं बांधण्यात आलं आहे. परंतु या व्हिडीओची सत्यता अद्याप पडताळली जात आहे.