शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

जगभरातील 'या' देशांमध्ये आहे भारतीय लष्कराचे 'मिल्ट्री बेस', नाव वाचून थक्क व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 10:21 PM

देशाला मजबूत करण्यासाठी भारतीय लष्कराने विविध देशात आपले बेस तयार केले आहे.

India Military Bases in Other Countries: मागील काही वर्षांपासून जगाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कुठे युद्ध सुरू आहे, तर कुठे प्रचंड अस्थिरता पसरली आहे. भारताच्या आजूबाजूची परिस्थिती पाहिली, तर पाकिस्तानची आर्थिक स्थिती कोणापासून लपून राहिलेली नाही. अशीच स्थिती श्रीलंकेची आहे. अफगाणिस्तानात तर तालिबानचे सरकार आहे. म्यानमारमध्येही लष्करी राजवट आहे. आता बांग्लादेशातही निवडून आलेले सरकार पाडण्यात आले. चीनची विस्तारवादी विचारसरणीही सर्वांनाच ज्ञात आहे.

शेजारचे वातावरण असे असल्यामुळे भारताला 24/7 अलर्ट मोडमध्ये राहावे लागते. त्यामुळेच भारत सातत्याने स्वतःला आणखी मजबूत करत आहे. भारत आपल्या तिन्ही सैन्य दलाची ताकद वाढवत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, केवळ आपल्या देशातच नाही, तर जगातील विविध देशांमध्ये भारताने आपला लष्करी तळ(मिल्ट्री बेस) तयार केला आहे. युद्धजैन्य परिस्थितीत शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत फार पूर्वीपासून तयारी करत आला आहे.

ताजिकिस्तानताजिकिस्तानच्या दक्षिणेकडील सुलतित फरखोर एअरबेस हा भारताचा पहिला लष्करी हवाई बेस आहे. ताजिकिस्तानच्या हवाई दलाच्या सहकार्याने भारतीय हवाई दलाने मध्य आशियात त्याची स्थापना केली.

भूतानभूतान हा भारताचा जवळचा मित्र आहे. भारतीय सैन्य भूतानच्या रॉयल भूतान आर्मी आणि रॉयल बॉडीगार्डला प्रशिक्षण देते.

मादागास्करहा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे, जिथे भारताचा लष्करी तळ आहे. याची स्थापना 2007 साली झाली. हा भारताचा परदेशातील पहिला इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स गोळा करणारा बेस कॅम्प आहे.

मॉरिशसमॉरिशसच्या अगालेगा बेटावर भारताचा लष्करी तळ आहे. हे हिंद महासागरातील भारत-मॉरीशस लष्करी सहकार्य कराराद्वारे बांधले गेला आहे. ही भारतासाठी एक महत्त्वाची धोरणात्मक पोस्ट आहे.

ओमानरास अल हद, ओमान येथे भारताची पोस्ट असून, दुक्ममध्ये दुसरी पोस्ट आहे. Duqm मध्ये भारतीय नौदल आणि हवाई दलाचा तळ आहे, जो लॉजिस्टिक सहाय्य आणि देखभाल सेवा पुरवतो.

सिंगापूरभारत आणि सिंगापूरच्या सहकार्यानेच चांगी नौदल तळावर भारताचेा बेस उभारण्यात आला आहे. या सुविधेद्वारे भारतीय नौदलाची जहाजे मलाक्काच्या आखातात गस्त घालतात. धोरणात्मक दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची पोस्ट आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदल